Breaking News

नांद्रा येथे द्विपिंड महादेव महाराज सप्ताह सांगता प्रसंगी भारुड गवळणींसाठी चाळीस भजनी मंडळांची उपस्थिती

 

*नांद्रा येथे द्विपिंडी  महादेव मंदिर सप्ताह सांगता प्रसंगी भारुड गवळणी साठी 40 भजनी मंडळ यांनी लावली उपस्थिती* (प्रा.यशवंत पवार)


पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथे गेल्या इंग्रज राजवटी पासून सुमारे दीडशे  वर्षांपासून जागृत देवस्थानअसणारे पिंडी महादेव महाराजांचा सप्ताह उत्साहात पार पडला दरवर्षी महादेव मंदिर विश्वस्त मंडळ व ग्रामस्थांच्या सहभागाने हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो सुमारे सात दिवस अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह प्रसंगी संपूर्ण पटांगण भाविकांनी फुलून गेलेले असते व सप्ताह सांगताच्या दिवशीही सकाळी चार वाजता काकडा आरतीलाही त्याच प्रकारे संपूर्ण भाविक हातात काकडा घेऊन आरती पूजन करत असतात व रात्रीही भारुड व गवळणी यांचा उत्तम असा कार्यक्रम सालावादाप्रमाणे घेण्यात येतो सप्ताह च्या सात दिवस ह भ प कीर्तनकार महाराजांच्या ज्ञानदानातून प्रबोधन करण्यात आले सप्ताह समाप्ती प्रसंगी परिसरातून मोठ्या संख्येने भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला यावर्षी ही जिल्ह्याभरातून जवळजवळ 40 भजनी मंडळांनी गवळण व भारुड यांचे सादरीकरण केले या सर्व मंडळांना कै.कैलास रामकृष्ण तावडे यांच्या स्मरणार्थ सन्मानचिन्ह व महादेव मंदिर संस्थान व गावातील ग्रामस्थ यांच्याकडूनही रोख स्वरूपात बक्षिसे देण्यात आली याप्रसंग



अध्यक्ष सुभाष त्रंबक पाटिल, सचिव बापू सर सूर्यवंशी, एकनाथ खंडू पाटील, उत्तम अण्णा बाविस्कर, संजय हिरामण पाटील,अनिल शामराव पाटी,माजी सभापती नितीनदादा  तावडे व मोठ्या संख्येने महिला माता-भगिनी व भाविक भक्त व ग्रामस्थ हजर होते सकाळी पाच वाजता मंदिरावर दहीहंडी फोडून या कार्यक्रमाची सांगता झाली जवळजवळ संपूर्ण श्रावण महिना जोपर्यंत दहीहंडी फुटत नाही तोपर्यंत गावात मास विक्री व खाणे बंद असते     


No comments