नांद्रा येथील रिक्त पोलीस पाटील पदी आसनखेडा खुर्द येथील पोलीस पाटील भुषण पाटील यांची प्रभारी पो. पा. म्हणून निवड
नांद्रा ता. पाचोरा (प्रतिनिधी)
प्रा. यशवंत पवार
नांद्रा येथील पोलीस पाटील म्हणून कार्यरत असलेले कै. किरण वसंत तावडे यांचे दि. 27 नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाल्यानंतर येथील रिक्त झालेल्या पदी कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व गावाचा कार्यभार सुरळीतपणे चालावा व गावात शांतता अबाधित राहावी या अनुषंगाने आसनखेडा खुर्द येथील मुळ गाव सांभाळून पोलीस पाटील भूषण फकीरा पाटील यांची उपविभागीय अधिकारी पाचोरा भूषण अहिरे साहेब यांनी पुढील आदेश येईपर्यंत अतिरिक्त पोलीस पाटील म्हणून कार्यभार पाहण्याचेेे आदेश दिले आहेत व नांद्रा येथील पोलीस पाटील म्हणून त्त्यांची निवड केली आहे ,भूषण पाटील हे नांद्रा येथील स्वातंत्र्य सैनिक कै.माधवराव लाला सूर्यवंशी यांचे नातू व माजी सैनिक कै. भारत माधवराव सूर्यवंशी यांचे भाचे व बापू भिका सूर्यवंशी यांचे जावई आहेत तरी नांद्रा संबंधित काही अडचण असल्यास मो. 7620511117 या नंबरावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे
नांद्रा येथील रिक्त पोलीस पाटील पदी आसनखेडा खुर्द येथील पोलीस पाटील भुषण पाटील यांची प्रभारी पो. पा. म्हणून निवड
Reviewed by Creative News
on
December 24, 2025
Rating: 5
No comments