नांद्रा येथील सर्वसामान्य कुटुंबातील सोनू याची अवघ्या 21 व्या वर्षी इंडियन एअर फोर्सच्या एक्स ग्रुपला निवड
आकाशाला गवसणी घालण्यासाठी सोनू ने घेतली अग्निपंख भरारी
नांद्रा येथील सर्वसामान्य कुटुंबातील सोनू याची अवघ्या 21 व्या वर्षी इंडियन एअर फोर्सच्या एक्स ग्रुपला निवड
अग्नीपंख क्लासेसचे घनश्याम खैरनार सर यांचे लाभले मोलाचे मार्गदर्शन
ग्रामीण भागातील तरुणाची मेहनत रंग लाई
नांद्रा ता. पाचोरा( प्रतिनिधी )
प्रा. यशवंत पवार
येथील व परिसरातील ग्रामीण भागातील तरुणांना इंडियन आर्मी,नेव्ही व एअर फोर्स या तिन्ही दलात भरती होण्यासाठी तरुणांनी मनाशीचंग बांधून मेहनत घेत आहेत याच दृष्टिकोनातून नांद्रा येथे गेल्या दहा वर्षापासून स्वतः स्पर्धा परीक्षेची तयारी करून आपल्या गावातील व परिसरातील तरुण यांना ही स्पर्धा परीक्षाच्या मार्गातून शासकीय नोकरीचा लाभ मिळावा म्हणून नांद्रे गावात छोट्या खाणी अग्निपंख क्लासेस च्या माध्यमातून घनश्याम प्रकाश खैरनार या तरुणाने स्पर्धा परीक्षा क्लासेस सुरू करून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन व गोडी लावली व त्यामधूनच अशा संघर्षाच्या काळानंतर गेल्या पाच वर्षापासून विद्यार्थी भरती होऊन निकाल येणे सुरू झाले यामध्ये अग्निपंख क्लासेसचे अनेक विद्यार्थी आर्मी,नेव्ही व एअर फोर्स मध्ये भरती होत आहेत तरी त्याना अजून पाहिजे तशी अभ्यासिकाही उपलब्ध नाही तरी त्यांना रात्री बारा वाजेपर्यंत क्लास चे मार्गदर्शन करण्याची जिद्द ,चिकाटी व मेहनत घनश्यांम सरांनी सुरू ठेवून विद्यार्थीही त्याच पद्धतीने मेहनत घेत आहेत व त्यासोबत आता विद्यार्थिनी ही या स्पर्धेमध्ये आपल्या कुटुंबाचं आई वडिलांचे नाव शासकीय नोकरीला लागून उज्वल करण्यासाठी या क्लासेस मध्ये सहभागी होत आहेत त्यामुळे दिवंगत स्वर्गीय जगदीश देवराम बाविस्कर ग्रामपंचायत लिपिक नांद्रा यांचे कनिष्ठ चिरंजीव अवघ्या एकविसाव्या वर्षात सोनू जगदीश बाविस्कर यांनी इंडियन एअर फोर्स ग्रुप एक्स यामध्ये उत्तीर्ण होऊन नोकरी लागल्याने हवाई दलात यशस्वी उडान घेतली आहे त्यामुळे नांद्राचा परिसरातील शैक्षणिक क्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्था,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व शिक्षण प्रेमी त्यांच्याकडून कौतुक व अभिनंदन होत आहे
स्व.जगदीश बापू यांचे चिरंजीव सोनू जगदीश बाविस्कर याचे इंडियन एअर फोर्स एक्स ग्रुपला निवड झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन प्रत्येक घरातील नव तरुणाच्या कुटुंबातून करण्यात येत असून त्यांनाही यामुळे आपल्या घरातील ही एक आपलाच मुलगा शासकीय सेवेत गेल्याचा आनंद व्यक्त होत आहे आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव कमी वयात नोकरी लागल्याने सोनुने घनश्याम सरांच्या मार्गदर्शनाने अग्निपंख क्लासेस ला यशस्वी लीड करून स्वयं अध्ययन व अभ्यासू वृत्ती जोपासून फेडली त्यामुळे त्याचे कौतुक व अभिनंदन नांद्रा परिसरातील नवतरुण व ग्रामस्थांकडून होत आहे

No comments