300 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या मायजी देवी यात्रोत्सवाला 3 जानेवारी पासून प्रारंभ -
नाद्रा ता. पाचोरा (प्रतिनिधी)
(* *प्रा.यशवंत पवार)*
*ऐतिहासिक परंपरा*
तीनशे वर्षाची परंपरा लाभलेल्या ऐतिहासिक माहिजी देवी यात्रेला पौष पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच दिनांक 3 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे सालाबादप्रमाणे यावर्षीही नवस, जाऊळ, निमसाळा देवीला नवसाला पावण झाल्यामुळे नवस फेडण्याची प्रथा आजही भाविक वर्गातून सुरू आहे या ऐतिहासिक माहीजी देवीची पादुकां पूजन व पालखी सोहळा व भव्य मिरवणूक दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळ 5.वा देवीच्या पादुका पूजन माहेजी येथील रहिवाशी व सध्या ठाणे येथे महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क मध्ये दुय्यम निरीक्षक पदावर कार्यरत असणारे रवींद्र रामराव पाटील व सौ.राधाताई रविंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते होणार , तर प्रमुख पाहुण्यांमध्ये खासदार स्मिताताई वाघ माजी खासदार एटी नाना पाटील पाचोरा आमदार किशोर आप्पा पाटील,पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल पवार यांची उपस्थिती लाभणार आहे गिरणा तीरावर असलेले या मंदिराला एरंडोल तालुक्याला जोडण्याचे काम आतापर्यंत एका होडीने सुरु आहे परंतु आता त्या ठिकाणी भव्य अशा पुलाचे कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे त्यामुळे धुळे जळगाव जिल्ह्याचा अंतर कमी होणार आहे म्हणून यामुळे दोन तालुक्यांना जोडण्याचा काम करणाऱ्या या पुलाच्या अनुषंगाने पुढे धुळे, मुंबई, व गिरणा पलीकडचे अनेक तालुके महामार्ग हि भविष्याच्या दृष्टिकोनातून बाजारपेठेसाठी दळणवळणासाठी सोयीस्कर होणार आहे.या गिरणा नदीवर या ऐतिहासिक मायजी देवीचे भव्य मंदिर व सभा मंडप झाल्याने त्या ठिकाणी आता धार्मिक कार्यक्रम विवाह कार्यक्रम व इतर शुभकार्य होत असल्यामुळे मंदिर कायम भावी भक्तांनी फुलून राहते त्यामुळे या ऐतिहासिक मंदिराची जागृत देवस्थान म्हणून ओळख निर्माण झाली आहे या ठिकाणी महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्त नवसाला पावण होणारे देवी म्हणून या ठिकाणी नवस मानून व फेडण्यासाठी येत असतात या ठिकाणी उद्योग व्यवसायात, गृहशांती, प्रपंच व कौटुंबिक सुख,लावावे म्हणून भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी पौष पौर्णिमेच्या दोन दिवस अगोदर येऊन आपली मनोकामना पूर्ण करतात व नवस फेडतात यात्रेला ऐतिहासिक महत्व असून शेकडो वर्षांपूर्वी ही यात्रा बारा महिने चालत होती या गावाला अगोदर चिंचखेडा असे संबोधले जायचे परंतु तत्कालीन वेळी देवीचा साक्षात्कार झाला व देवी माय प्रकटली म्हणून मायजी हे नाव पडले
*आख्यायिका*
अशी आहे की महिजी देवी व त्यांची लहान बहीण गावात येत असताना लहान मुलांनी बघितले व तिला वेडसर म्हणून देवीला त्यांनी हि नवले यामुळे माहिजी देवीने तिच्या तीक्ष्ण नजरेने त्या मुलांकडे बघितले त्याच वेळेस ते मुलं मुर्चीत येऊन पडले ही बातमी गावातील लोकांना कळल्यानंतर भाविकांनी देवीला विनंती केले तेव्हा देवीने पुन्हा त्यांना शुद्धीवर आणले व काही पावलावरच त्या जाता जाता दोघ बहिणी अदृश्य झाल्या,कालांतराने त्या ठिकाणी त्या जागेवरच त्रिशूल व बाण निघाले त्यावरून माय प्रकटली असे लोकांची समज व श्रद्धा झाल्यामुळे तेथे लोकांनी जीर्णोद्धार करून देवीचे मंदिर साकार केले यानंतर मायचे गाव म्हणजे मायजी असे या गावाला संबोधण्यात येऊ लागले कालांतराने अपभ्रंश होऊन मायजी चे माहिजी असे नाव झाले अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे व त्याच देवीच्या नावावरून इंग्रज राजवटी पासून नांद्रावरून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर व कुरंगी येथून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वे स्टेशनला,चार किलोमीटर अंतर असणाऱ्या माहिजी या गावाचे नाव देण्यात आले
*पालखी सोहळा*
गेल्या दहा वर्षापासून माहीजी येतील गावातील भक्तगण यांनी सुरू केलेल्या माहीजी देवीच्या पादुका, पालखीची मिरवणूक व पूजन पौष पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच या वर्षी दिनांक 3 जानेवारी सकाळी 5 वाजल्यापासून संवादय ,,टाळ मृदंगाच्या गजरात संपूर्ण गावातून भव्य अशी मिरवणूक निघते याबरोबरच नामांकित पाच बँडही आपली उपस्थितीत देणार आहेत यादरम्यान संपूर्ण गावात दारांवर सडा,रांगोळी, घरांवर गुढी, पताका,झेंडे, उभारून गावासह परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होत असते दरवर्षी नामवंत बँड देवींच्या गाण्यांचे सवाद्य मिरवणुकीसाठी लावण्यात येत असतात त्या अगोदर पौष पौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजेच 2 जानेवारी ला वरसाडे येथूनही माहिजी देवीच्या पादुका पालखी सोहळा सालाबादा प्रमाणे काढण्यात येते या पादुका व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते त्या ठिकाणीही दोन बँडवर संवाद्य भव्य मिरवणूक वरसाडे ते माहिजी काढण्यात येणार आहे यावर्षी देवीची सेवा दरवर्षी नित्यनेमाने भगत कुटुंबात बदलत असते यावर्षी सेवेचे मानकरी म्हणून गुलाब धनराज भगत यांच्या कुटुंबला देण्यात आली आहे , मंदिर परिसरात होम, हवन, सत्संग,देवी चे भजन, व रात्री कीर्तनाचे कार्यक्रम असतात या यात्रेला भाविकांची विशेष सोय ग्रामपंचायत कमिटी सरपंच उपसरपंच यांच्यासह सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील व ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात येते यात्रादरम्यान चोरी चपाटी,मुली व महिलांची कुठल्याच प्रकारची अनुचित प्रकार घडू नये म्हणून चौक बंदोबस्तासाठी छावणी टाकून पाचोरा तालुक्यातील पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाने बीट हवालदार,पोलीस विभागातर्फे प्रशासन चौक बंदोबस्त करत असतात
300 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या मायजी देवी यात्रोत्सवाला 3 जानेवारी पासून प्रारंभ -
Reviewed by Creative News
on
December 31, 2025
Rating: 5
No comments