Breaking News

पाचोरा तालुका पोलीस पाटील संघटना कडून नांद्रा येथील पाटील कुटुंबाला एक हात मदतीचा*



 पाचोरा तालुका पोलीस पाटील संघटना कडून नांद्रा येथील पाटील कुटुंबाला एक हात मदतीचा

पो. पा. संघटने कडून नांद्रा येथील कै. किरण वसंत तावडे यांच्या कुटुंबाला सांत्वनपर 52750/- रु ची मदत*

गाव कामगार पोलीस पाटील संघटना, महाराष्ट्र राज्य यांनी दिला पाटील कुटुंबाला भावनिकहीं आधार

नांद्रा ता.पाचोरा ( प्रतिनिधी)

 *प्रा.यशवंत पवार*



गाव कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पाचोरा तालुका पोलीस पाटील संघटना यांच्या वतीने नुकतेच आकस्मित निधन झालेले नांद्रा येथील पोलीस पाटील कै.किरण वसंत तावडे वय 46 यांचे अल्पवयामध्ये दुःखद निधन झाल्यामुळे त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी व त्यांचे दोन मुलं जे शिक्षण घेत आहेत अशा या कुटुंबावर त्यांच्या आकस्मित जाण्याने जो मानसिक आघात झाला त्यामुळे त्यांना मनोबल व धैर्य देण्याबरोबरच एक छोटीशी आर्थिक मदत म्हणून पाचोरा पोलीस पाटील संघटना कडून पाचोरा तालुक्यातील संपूर्ण गावातील पोलीस पाटील बंधू व भगिनी यांच्यामार्फत या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून 52750/- रु. ची मदत देऊन एक भावनिक आधाराबरोबरच थोडासा आर्थिक आधारित दिला असल्याने या सामाजिक स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत असून भविष्यात पाचोरा तालुक्यातील कोणत्याही पोलीस पाटीलवर अशा प्रकारचा दुर्दैवी संकट आल्यास संघटना त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे माजी कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक सदस्य तथा जळगाव जिल्हा माजी जिल्हाध्यक्ष श्री.दीपक चौधरी,पाचोरा तालुका अध्यक्ष भगवान पवार यांनी यावेळी सांगितले याप्रसंगी पाचोरा तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेचे प्रतिनिधी म्हणून पोलीस पाटील पंजाबराव पाटील लासगाव, किरण पाटील असनखेडा,भूषण पाटील आसनखेडा, भूषण सोळुंके बांबरुड,चेतन पाटील घुसर्डी,श्रीकांत पाटील भोरटेक, योगेश पाटील वेरूळी, विनोद पाटील संगमेश्वर, विजय ठाकरे परधाडे,राहुल खैरनार भातखंडे,मुकेश अहिरे खाजोळा, राजू पाटील माहेजी,पोलीस पाटील पहाण, राहुल देशमुख सारोळा, प्रताप ठाकरे चिंचखेडा, विनोद सयाजी पा गाळण, समाधान पाटील वडगाव, तुकाराम तेली खडकदेवळा, हे उपस्थित होते पाचोरा तालुक्यातील सर्व गावातील पोलीस पाटील यांनी या ठिकाणी आर्थिक मदत देऊन आपलं सामाजिक ऋण या निमित्ताने व्यक्त केल्याचे बोलले जात आहे याबरोबरच संघटनेमार्फत भविष्यातहीं प्रत्येक पोलीस पाटील यांचे विमा काढून घेण्याचे व शासन दरबारीही त्या संदर्भात शासनाकडूनही संपूर्ण पोलीस पाटील यांना विमा लागू करण्यात चे धोरणावर चर्चा करणार असल्याचेही संघटनेच्या पदाधिकारी यांनी यावेळी सांगितले



No comments