Breaking News

रब्बीलाही पिक विमा लागू!परंतु खरीपाच्या पिक विमाची रक्कम कधी? शेतकरी वर्गांमधून संतप्त सवाल


रब्बीलाही पिक विमा लागू ! परंतु खरीपाच्या पिक विमाची रक्कम कधी? 

शेतकरी वर्गांमधून संतप्त सवाल 

नांद्रा ता. पाचोरा( प्रतिनिधी )

प्रा. यशवंत पवार



यावर्षी अस्मानी संकट संपता संपायचं नाव घेत नाही आहे नोव्हेंबर महिना उजाडला तरी पावसाचा हाहाकार अतिवृष्टीच्या मार्फत सुरूच आहे थोडाफार वेचणीला आलेला हाता तोंडाशी कपाशीचा घास हीं शेतातच बोंडांना कोंब फुटल्याने तोही हिरावून घेण्यात आला संपूर्ण आलेला कडधान्य शेतात सडले,कपाशीला बोंडांना शेतातच कोंब अंकुरले,सोयाबीन शेतातच आडवा झाला, मक्का पाण्यावर तरंगत आहे अशा एक ना आसमानी सुलतानी संकटात शेतकरी भरडला जात असताना शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर होऊनही खात्यांवर फक्त 80 टक्केची रक्कम जमा तीही 50 टक्के, कोरडवाहू साठी हेक्टरी साडेआठ हजार व बागायतीसाठी हेक्टरी 17000 अनुदान होते परंतु प्रत्यक्षात सरसकट साडेआठ हजारी हेक्टरी निकषानुसारच अनुदान प्राप्त झाले आहे दहा हजाराचे रब्बी अनुदान कधी मिळणार? खरीप हंगामाचा पदरी चा पैसा खर्च करून पिक विमा काढलेला शेतकऱ्यांना अद्याप कुठल्याच प्रकारे एक रुपयाहीं आला नाही त्यानंतर शासनाने नुकतीच रब्बी हंगामासाठी ही पिक विमा ची घोषणा केली आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये मात्र निरुत्साह चे वातावरण पिक विमा बाबत निर्माण झाले आहे कारण अगोदरचा पिक विमा चे निकष बदलवून आता नवीन निकष लावण्यात आलेले आहेत त्याबरोबरच हवामानाच्या निकषानुसार जी भरपाई तात्काळ मिळायला हवी ती अद्यापही खरीप हंगामाची शेतकऱ्यांना मिळाली नाही त्यामध्ये आता हात्ता तोंडाशी आलेला संपूर्ण खरिपाचे पिके नोव्हेंबर महिन्याच्या अतिवृष्टीनेही संपूर्ण ने स्तनाबूत केली आहे तरी शेतकऱ्यांमध्ये आता संताप व उद्रेकाची भावना निर्माण झाली असून खरीप हंगामाचे संपूर्ण अनुदान,रब्बी हंगामाचे पेरणी अनुदान व खरीप हंगामाचा पिक विमा ची रक्कम तात्काळ खात्यांवर टाकण्यात यावी जेणेकरून रब्बी हंगामासाठी शेतीला लागणारा खर्चाचे नियोजन शेतकरी बांधवांना करता येईल या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या मागणीने आता जोर धरलेला आहे

No comments