Breaking News

125 किलो गटातील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत गाळणचे सुपुत्र पै.हितेश अनिल पाटील यांनी जिकंले गोल्ड मेडल


125 किलो गटातील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत गाळणचे सुपुत्र पै.हितेश अनिल पाटील यांनी जिकंले गोल्ड मेडल

पुढे उजबेकीस्थान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड,

भारताकडून प्रतिनिधी करायची मिळाली ग्रामीण भागातील तरुणाला संधी

नांद्रा ता. पाचोरा (प्रतिनिधी )

प्रा.यशवंत पवार 

मिशन ओलंपिक गेम असोसिएशन आयोजित ऑल इंडिया वरेस्टिंग चॅम्पियनशिप 2025 स्पर्धा कर्नाटक येथील बेळगाव येथे नुकतीच संपन्न झाली या राष्ट्रीयस्तरावरील कुस्ती स्पर्धेत तारखेडाचा सुपुत्र पैलवान हितेश अनिल पाटील याने 125 किलो वजनी खुले गटात महाराष्ट्र कडून प्रतिनिधित्व करून सुवर्णपदक पटकावले त्यामुळे पुढे नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या उजबेकीस्तान येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी त्याची 125 किलो वजनी गटातून भारताकडून निवड झाली आहे त्याच्या या यशामुळे तारखेडा गाळण सह संपूर्ण परिसरातील गावांमध्ये तसेच पाचोरा भडगाव तालुक्यातून व नातेवाईकामधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे व त्याने संपन्न केलेल्या यशामुळे त्याने महाराष्ट्राचे जिल्ह्याचे व आपल्या गावाचे गाळण  चे नावलौकिक केल्याची धन्यता वडील अनिल धना पाटील माजी सभापती पाचोरा व संचालक शेतकरी सहकारी संघ पाचोरा व आई सौ ललिता अनिल पाटील यांनी केले आहे ते नांद्रे येथील विनोददादा तावडे यांचे मावस भाऊ आहे

No comments