पाचोरा- तुळजाभवानी नियमित बस सुरु - आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठपुरावाला यश
नांद्रा ता. पाचोरा प्रतिनिधी-
(प्रा. यशवंत पवार )
नुकताच नवरात्री उत्सवानिमित्त संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तुळजाभवानी मातेसाठी प्रत्येकाचं भाविकांचं त्या ठिकाणी नतमस्तक होऊन आपले मनातील सुप्त इच्छा व भावना व्यक्त करून आई चरणी माथा टेकून इच्छा पूर्ण होण्यासाठी साकडे घातले जात असते अनेक नवं दांपत्य त्यांना किंवा अनेक परिस्थितीने जाण्याची इच्छा असूनही न गेलेल्या भाविकांसाठी पाचोराच्या आगारातर्फे ही एक लांब पल्ल्याचा प्रवास घडवून भाविकांनाही कुठल्याच प्रकारची गैरसोय न होता डायरेक्ट तुळजाभवानी मातेचे दर्शन व्हावे म्हणून पाचोरा भडगाव चे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नांनी व पाचोरा आगर प्रमुख त्याच प्रकारे या विशेष फेरीसाठी सेवा सेवेसाठी तत्पर असणारे वाहक हिरालाल आप्पा सूर्यवंशी यांच्या समन्वयातून आमदार किशोर आप्पा पाटील यांना साकडे घातल्यानंतर पाचोराच्या आगारासाठी नेहमीच तुळजाभवानीसाठी जाणारे भक्तांची ओढ व त्यात महिला भगिनी, वृद्ध- ज्येष्ठ माता-भगिनी यांचीही सेवा घडावी व त्यांना थेट कमी खर्चात बस सेवेचा लाभ व्हावा म्हणून आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सकारात्मक मागणीनुसार जळगावचे विद्यमान डीसी श्री दिलीप बंजारापाचोरा आगार डीएम
श्री प्रकाश पाटीलए टी एस श्री प्रयास सोनें टी आय श्री राहुल नजान यांच्या मार्गदर्शनातून उद्घाटन वाहतूक कंट्रोल हिरालाल ओंकार पाटील, वाहन परीक्षक श्री गवंडे तुळजापूर पाचोरा बसचे चालक संदीप पाटील,वाहक फिरोज सय्यद व इतरयांनी नवरात्रोत्सवाच्या प्रारंभ पाचोरा पासून तुळजाभवानी मार्ग वरखेडी शेंदुर्णी पहूर सिल्लोड भोकरदन जालना अंबड बीड गेवराई येरमाळा नियमित बस सेवा सकाळी 6. वाजता पाचोरा येथून तुळजापूर व तुळजापूर वरून सकाळी पाच वाजता पाचोरा अशी बस सेवा नियमित सुरू करण्यात आले आहे तरी भाविक भक्तांनी जास्तीत जास्त त्याचा लाभ घ्यावा अशी पाचोरा आगार तर्फे आवाहन करण्यात येत आहे
पाचोरा- तुळजाभवानी नियमित बस सुरु - आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठपुरावाला यश
Reviewed by Creative News
on
October 07, 2025
Rating: 5
No comments