Breaking News

नांद्रा येथे महिला सक्षमीकरण मेळाव्यात 38 गटांचा सहभाग,सुमारे दीड कोटी कर्ज वितरण


नांद्रा येथे महिला सक्षमीकरण मेळाव्यात 38 गटांचा सहभाग,सुमारे दीड कोटी कर्ज वितरण 

नांद्रा ता. पाचोरा(प्रतिनिधी )

 (प्रा यशवंत पवार )- 

येथे बँक ऑफ बडोदा शाखा नांद्रा व्यवस्थापक कुणाल जाधव यांच्या समन्वयातून नांद्रा येथील बँक ऑफ बडोदा शाखेच्या अंतर्गत येणाऱ्या परिसरातील गावातील महिला बचत गटांच्या सक्षमीकरण व कर्ज वितरण मार्गदर्शन, प्रोत्साहन मेळावा दि. 21 जुलै वार सोमवार रोजी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बचत गटाच्या गट समन्वयक दामिनी पाटील यांनी केले याप्रसंगी मेळाव्याला नांद्रा परिसरातील एकूण 38 बचत गटांनी आपला सहभाग नोंदवला या बचत गटांना उमेद अभियान अंतर्गत सी.सी असणारे वसंत पाटील,एम आय एस संदीप खेडकर यांनी उद्योग व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन केले त्यामध्ये प्रत्येक बचत गटांमध्ये साधारणतः प्रत्येक गटाला कमीत कमी 3 लाख ते 6 लाख असे सुमारे 1 कोटी 64 लाख कर्ज वितरित करण्यात आले या मेळाव्याला मोठ्या संख्येने परिसरातील महिला बचत गट उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने

प्रत्येकाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, जीवन ज्योती योजना,अटल पेन्शन योजना, सुकन्या समृद्धी योजना तसेच बँकेत इतर सुविधा व तसेच कर्ज नियमित फेडल्यामुळे बचत गटांना होणारे लाभ व नियमित कर्ज भेटल्यामुळे तयार होणार आपले क्रेडिट यामुळे छोटे छोटे लघुउद्योग बचत गटांमार्फत कसे उभारी घेऊ शकतात? याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले तसेच इतर फसव्या जाहिराती व बँक विषयी जागृता ग्राहकांसाठी कशी महत्त्वाची आहे?याविषयी माहिती सांगण्यात आली या कार्यक्रमाला बँक ऑफ बडोद्याचे व्यवस्थापक कुणाल जाधव,प्रशांत गवळी, श्रेयस सोनी तसेच सीआरपी माधुरी पाटील,ज्योती तावडे, स्वाती पाटील, जया पाटील,सोनाली बडगुजर,सविता महाले या उपस्थित होते

No comments