नांद्रा -पहान रस्त्यावरील नागोबा जवळ नागपंचमी निमित्त उद्या महाप्रसाद व यात्रेचं आयोजन
नांद्रा ता.पाचोरा (प्रा यशवंत पवार )
येथे मागील वर्षी नांद्रा ते पहाण दरम्यान असणारे व पारंपारिक ग्रामदैवत नागोबा महाराज यांच्या अगोदर असणाऱ्या छोट्या मंदिराचा गेल्या वर्षी जिर्णोद्धार व बांधकाम करून मोठ्या मंदिरात रूपांतर करण्यात आले आहे यानिमित्ताने यावर्षी दिनांक 27 जुलै वार मंगळवार रोजी नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर या ठिकाणी नागोबा महाराज यांची महापूजा व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे महाप्रसादची वेळ दुपारी 12 ते 3 वाजेची आहे यादरम्यान लहान मुलांसाठी खेळण्याचे छोटे-मोठे पालखी व छोट्या खेळण्याची दुकान आहे या ठिकाणी दुकान थाटून यात्रेचं छोटे स्वरूपात या वर्षापासून श्रीगणेशा होणार आहे व पुढील वर्षापासून यात्रेला मोठ्या स्वरूपात व्याप्ती मिळणार आहे तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असेआवाहन नागोबा महाराज भक्त मंडळ नांद्रा, पहाण,हडसन व परिसरातील भाविक भक्तांनी केले आहे
नांद्रा -पहान रस्त्यावरील नागोबा जवळ नागपंचमी निमित्त उद्या महाप्रसाद व यात्रेचं आयोजन
Reviewed by Creative News
on
July 27, 2025
Rating: 5
No comments