Breaking News

जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिनानिमित्त पाचोरा -भडगाव अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान, पाचोरा प्रांत कार्यलय महसूल सहाय्यक मनोहर राजेंद्र, बांबरुड पोलीस पाटील भूषण साळुंखे यांचाहीं सन्मान


जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिनानिमित्त पाचोरा -भडगाव अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान, पाचोरा प्रांत कार्यलय महसूल सहाय्यक मनोहर राजेंद्र, बांबरुड पोलीस पाटील भूषण साळुंखे यांचाहीं सन्मान 



नांद्रा ता. पाचोरा(प्रतिनिधी)

(प्रा यशवंत पवार )

महाराष्ट्र शासनाच्या महसूल सप्ताह दिनानिमित्त दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी 7ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात मा.पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते जळगाव जिल्ह्याचे महसूल विभागातील उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा शासन स्तरावर त्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यामध्ये पाचोरा प्रांत कार्यालयाचे महसूल सहाय्यक मनोहर नामदेव राजेंद्र तर बांबरुडचे पोलीस पाटील भूषण सोळुंके याबरोबरच पाचोरा तालुक्यातील विविध प्रशासकीय सेवेत कार्यालयात असलेले अधिकारी वर्गामध्ये तहसील कार्यालय भडगाव चे नायब तहसीलदार रमेश प्रभाकर देवकर, तहसील कार्यालय पाचोरा महसूल मंडळ अधिकारी भरत ननवरे, सहाय्यक महसूल अधिकारी वरद वाडेकर,तहसील कार्यालय भडगाव ग्राम महसूल अधिकारी संजय सोनवणे,तहसील कार्यालय शिपाई पाचोरा कांतीलाल तेली यांचा सन्मान माननीय पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे याबरोबरच आमदार सुरेश मामा भोळे,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे,प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले याप्रसंगी आत्महत्या पीडित कुटुंबांना मदत,किसान सन्मान योजना व वृद्ध व महिलांकरिता प्रमाणपत्र सेवा, पुरवठा विभाग डिजिटल सेवा करण्यात आल्याचे मान्यवरांच्या भाषणातून सांगण्यात आले

No comments