..यावर्षीही दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे, शेतकऱ्यांची पिक विमा काढण्यासाठी लगबग सुरू
नांद्रा ता.पाचोरा*(*प्रतिनिधी*)
प्रा यशवंत पवार
प्रधानमंत्री पिक विमा योजना या वर्षापासून शेतकऱ्यांना स्वतः काढावी लागत असल्याने अगोदर एक रुपयात निघणारी पिक विमा मात्र आता पदरीचा पैसा खर्च करून त्यानुसार विमा काढावा लागत असल्याने यावर्षीही दुष्काळ सदृश्य परिस्थिती खरीप पिकाची निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची वाढीव पिक विमा नोंदवण्यासाठी 14 आगस्ट पर्यंत तारीख वाढल्याने पिक विमा काढण्यासाठी लगभग सुरू झाली आहे
सालाबादप्रमाणे दरवर्षी शेतकऱ्यांना खरीप हंगाम सुरू होण्याच्या अगोदर निसर्गाची पावसाची दमदार पडण्याची अपेक्षा असते याच आशेवर भोळा भाबडा,कष्टकरी शेतकरी आपल्या धरती मातीमध्ये सोन पिकवण्यासाठी कष्टाच्या घामाबरोबरच,महागडे कीटकनाशक, बी बियाणे,रासायनिक खते, औषधी व मजुरी भरून आपली शेती आपल्या कुटुंबासमवेत कसत असतो व ऐन डोलात येणारे पीक घरापर्यंत उत्तमरीत्या पिकून उत्पादनात वाढ होण्याची वाट दर वर्षी पाहत असतो परंतु शेतकऱ्याचे दरवर्षीच निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यावर उत्पादनात घट येऊन कवडीमोल भावाने शेती माल विकत असल्याने पाणी फिरत आहे यावर्षीही मे महिन्यात मध्यंतरी पावसाने सुरुवात केल्यामुळे पुढेही दमदार पाऊस चालूच असेल अशी अपेक्षा ने शेतात मृग नक्षत्रावरच शेतकऱ्यांनी प्रेरणा पूर्ण केल्या सुमारे 95 टक्के पेरण्या पूर्ण होऊनही श्रावण महिन्यात संपूर्ण जुलै महिना हा कोरडा टाक उभा राहिला त्यामुळे कोरडवाहू शेतकरी यांची शेतातली मका,ज्वारी, उडीद,मूग,सोयाबीन, कपास यासारखे पिके ऐन बहराच्या मोसम मध्ये पाणी नसल्यामुळे कोरमंडण्याच्या परिस्थितीत येऊन ठेपले आहेत त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे याच अनुषंगाने केंद्राने घोषणा केला प्रमाणे प्रधानमंत्री पिक विमा 2022 पासूनचा थकीत पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या थेट खात्यात सोमवारपासून पडण्याचे ग्वाही दिल्यानंतर शेतकऱ्यांना यावर्षीही खरिपाचे पीक जेमतेम येईल की नाही याच चिंतेमुळे शेतकऱ्यांनी यावर्षी स्वतः पिक विमा काढण्यासाठी सीएससी सेंटरवर आपली लगबग सुरू केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात पैसा,मजुरीला पैसा, उदरनिर्वासाठी पैसा,मुलांच्या संगोपन शिक्षणासाठी पैसा व आता पिक विमा साठी अगोदर एक रुपयात निघणारा पिक विमा आता त्यासाठी सुद्धा पैशाचं नियोजन करण्यासाठी शेतकरी बंधूंची तारांबळ उडत असून पोटाला चिमटा घेणारा शेतकरी मात्र कायमच निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी हवाल दिल होत चालला आहे हे मात्र निश्चित! व त्यात अजूनही मागील वर्षाचे सामूहिक रित्या दुष्काळ अनुदान अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पडलेले नाही तरी दुष्काळ अनुदान व पिक विमा पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात या शेती मशागतीसाठी गरजेचे वेळेस पडल्यास शेतकरी निश्चित समाधानी होतील हे मात्र निश्चित!
.यावर्षीही दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे, शेतकऱ्यांची पिक विमा काढण्यासाठी लगबग सुरू
Reviewed by Creative News
on
August 10, 2025
Rating: 5
No comments