नांद्रा बँक ऑफ बडोदा शाखा रामभरोसे, मॅनेजर अभावी ग्राहकांच्या समस्यात वाढ
नांद्रा बँक ऑफ बडोदा शाखा रामभरोसे, मॅनेजर अभावी ग्राहकांच्या समस्यात वाढ
नांद्रा ता. पाचोरा प्रतिनिधी (प्रा. यशवंत पवार)
नांद्रा येथील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची गृहिणींची,नोकरदार,पगारदार, व्यापरी व लाडक्या बहिणींची बँक म्हणून ज्याची ओळख आहे अशी संपूर्ण ग्रामीण भागात नेटवर्क असणाऱ्या बँक ऑफ बडोदा नांद्रा शाखेचे मात्र गेल्या काही वर्षापासून बोजबारा उडताना दिसत असून सध्या तरी मॅनेजर अ भावी या शाखेचा काम रामभरोसे सुरू आहे.नांद्रा शाखेमध्ये परिसरातील सात आठ गाव लागून शेतकऱ्यांचे पीक कर्ज,बचत गट महिलांचे खाते उघडणे,विद्यार्थ्यांचे एज्युकेशन लोन, संजय गांधी निराधार योजनेचे मानधन ,लाडक्या बहिणींच्या मानधन ,आणि त्यामध्येच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक बचत खाते असा संपूर्ण कारभार हा नांद्रा बँके शाखेत होत असल्याने या ठिकाणी अगोदरचे व्यवस्थापक असलेले निलेश पवार यांची येथून गेल्या दहा-बारा दिवसापासून बदली झाली असून त्यामुळे मात्र या ठिकाणी बचत खाते महिला बचत गटांचे खाते, शेतकऱ्यांचे कर्ज खाते,कर्ज खाते,नवीन कर्ज नूतन करणे व नवीन कर्ज घेणे अशा एक ना अनेक समस्या बँकेचे कर्मचारी कधी साईट बंद तर कधी टॅब बंद तर कधी लाईट बंद तर कधी कॅश शिल्लक नाही तर व्यवस्थापक नाही कधी अगोदर विड्रॉल द्या अशा समस्या मुळे ऐन शेतीच्या कामगिरीच्या दिवसात शेतकरी वर्ग तासनतास तिथे ताटकळत उभा असतो तर लाडक्या बहिणींची ही अशीच फरपट त्यामुळे होत आहे,महिला बचत गटांचे खाते ओपनिंग पेंडिंग आहेत अशा एक ना अनेक समस्यांनी बँक ऑफ बडोदा नांद्रा शाखा रामभरोसे झाल्यामुळे परिसरामध्ये सर्व सुज्ञ नागरिक यांच्यामध्ये संतापाची लाट निर्माण होत असून नवीन मॅनेजर तात्काळ नेमण्यात यावा अशी मागणी होत असून टोलवाटोलवी करणारे कर्मचाऱ्यांचेही बदली करण्याची मागणी होत आहे

No comments