Breaking News

महाराष्ट्रभरातील सुरक्षा मंडळाचे सुरक्षारक्षक दिसतील आता खाकी मध्ये जळगाव जिल्हा सुरक्षा रक्षक यांना सहा.कामगार आयुक्त गुल्हाने यांच्याकडून खाकी कापड वाटप


महाराष्ट्रभरातील सुरक्षा मंडळाचे सुरक्षारक्षक दिसतील आता खाकी मध्ये 

जळगाव जिल्हा सुरक्षा रक्षक यांना सहा.कामगार आयुक्त गुल्हाने यांच्याकडून खाकी कापड वाटप

 पाचोरा (प्रतिनिधी प्रा यशवंत पवार )

महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळांना गेल्या अनेक वर्षापासून खाकी गणवेश मिळावा म्हणून विविध संघटना व सुरक्षा रक्षक हे मागणी करत होते त्याच अनुषंगाने कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी 1 मे पासून महाराष्ट्र भर नोंदणीकृत सुरक्षा कर्मचारी यांना खाकी कापड वाटप करण्यात येत असून त्याचं अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक श्रम कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हा अध्यक्ष संदीप सोनवणे यांच्या प्रयत्नाने धुळे,नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांना‌ खाकी गणवेशाचा कपडा दि 28 मे 2025 पासून मा.कामगार आयुक्त - श्री. राजू गुल्हाने सर यांच्या हस्ते जळगाव येथील सुरक्षारक्षक यांना वाटप करण्यात आला राज्यभरात 16 सुरक्षा रक्षक मंडळ कार्यरत असून  या नवीन खाकी गणवेशमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर सुरक्षा रक्षक यांच्यामध्ये एकसमानतेची भावना निर्माण होऊ निळी टोपी व सुरक्षा मंडळाचा लोगो व नाव ड्रेस वर असा खाकीचा रुबाब आता सुरक्षारक्षक यांनाही मिळणार आहे याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक श्रम कामगार युनियन जळगावचे जिल्हाध्यक्ष संदीप सोनवणे



 चिटणीस अमोल तांबे,सुरक्षा रक्षक मयूर पाटील, सोपान वाघ, निलेश पवार, दशरथ राठोड इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते

No comments