Breaking News

क्रिएटिव्ह स्कूल ला शिक्षक पालक सभा उत्साहात संपन्न


क्रिएटिव्ह स्कूल ला शिक्षक पालक सभा उत्साहात संपन्न 

नांद्रा ता.पाचोरा (वार्ताहर )

(प्रा यशवंत पवार

येथे दिनांक 29 नोव्हेंबर वार शनिवार रोजी सकाळी 9 वाजता शिक्षक पालक सभा संपन्न झाली या सभेला पालक प्रतिनिधी अध्यक्ष म्हणून विलास सुभाष पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पालक प्रतिनिधी आसनखेडा येथील अशोक हरी पाटील,बांबरुडचे फौजी मुक्तार मेवाती ,आसनखेडाचे फौजी अविनाश पाटील,निलेश गोकुळ पाटील, विशाल साहेबराव पाटील, किरण नेताजी पाटील, निलेश पाटील,पुरुषोत्तम पाटील, संदीप महाले, गोकुळ दारकोंडे,संदीप जगताप, रोशन शेख,आधार पाटील, दत्तू कोळी,मन्साराम पाटील, किरण मोरे,ईश्वर पाटील,नाना मिस्तरी,मनोज पाटील,गुणवंत पाटील, भगवान पाटील, नितीन बोरसे,फारुक शेख सर, सोपान पाटील, अविनाश सूर्यवंशी,विनोद तडवी, नितेश जगताप, पवन सूर्यवंशी, कैलास तावडे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका हर्षदा सोनार आरती सोनवणे कीर्ती सोनजे यांनी केले तर प्रास्ताविक शिक्षिका नम्रता पवार यांनी केले त्यात त्यांनी प्रथम सत्रातील विद्यार्थ्यांचे विविध गुणवत्ता,नवोपक्रम व ओलंपियाड परीक्षा व प्रत्येक वर्गाच्या टीचर्स यांनी केलेले शैक्षणिक कार्य व विद्यार्थ्यांच्या आनंदी व आरोग्यदायी राहिल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची नियमित गोडी कशी लागते त्याचे महत्त्व सांगितले याबरोबरच पालक प्रतिनिधी यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना ईश्वर पाटील पाहण यांनी समाधान व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती विषयी वाढता आलेख सांगितला यावेळी प्रा. यशवंत पवार यांनी आलेल्या प्रमुख अतिथी व सर्व पालक वर्ग यांचे स्वागत करून शाळा कुटुंब व समाज यामध्ये शिक्षक पालक सभा यामुळे समवाय साधला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांचं सर्वांगीण विकास कशा रीतीने होतो ते आपल्या मनोगतच सांगून अपार आयडी निर्मिती करणे,आधार अपडेट करणे,शैक्षणिक सहल, वार्षिक स्नेहसंमेलन,ओलंपियाड परीक्षा, फी संदर्भात,पुढच्या वर्षी पासून चौथीची शिष्यवृत्ती परीक्षा याबरोबरच घरचा अभ्यास स्कूलचा अभ्यास याविषयी करायचे नियोजन या सर्व गोष्टींचा विषयांवर सांगोपांग चर्चा करून चर्चा घडवून पालकांचे समाधान केले यावेळी आभार प्रदर्शन अरुंधती राजेंद्र यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शितल पाटील कीर्ती सोनजे गीता पटाईत हर्षदा सोनार आरती सोनवणे नम्रता पवार शालिनी भोई पूजा सूर्यवंशी चंद्रकला तावडे भगवान गोपाळ यांनी परिश्रम घेतले

No comments