Breaking News

30 वर्षानंतर 1996 च्या बॅच चे गेट-टुगेदर च्या निमित्ताने एकवटले वर्गमित्र







30 वर्षानंतर 1996 च्या बॅच चे गेट-टुगेदर च्या निमित्ताने एकवटले वर्गमित्र

प्रत्येकाने आपल्या जीवनातील सुख दुःखाला कटू गोड आठवणी सांगून भावनांना केली आस्वाद्वारे मोकळी वाट 

मित्र वनव्यात गारवासारखा.,यापुढेही प्रत्येकाच्या सुखदुःखात हजर राहण्यासाठी दिले वचन

नांद्रा ता.पाचोरा (प्रतिनिधी )

प्रा. यशवंत पवार 

येथील धी शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल ला 1996 च्या दहावीत असणारे वर्गमित्र यांनी गेट-टुगेदर नियोजन दिनांक 3 जानेवारी रोजी साई मोक्ष कार्यालय पाचोरा येथे आयोजित केले होते या निमित्ताने मुंबई,नाशिक, पुणे,जळगाव, नेदरलँड, मालेगाव,नांद्रा, कुरंगी,माहेजी स्टेशन, पहाण,आसनखेडा, अशा गावातून तत्कालीन विद्यार्थी वर्गमित्र व वर्गमित्र यांनी उपस्थिती दिली होती सुमारे 60 ते 70 वर्गमित्र या निमित्ताने एकवटले सुरुवातीला आज आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती व राष्ट्रमाता जिजामाता यांची जयंती त्यानिमित्त त्यांना त्रिवार अभिवादन करून सरस्वती देवीचे प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण शिक्षक वृंद आ. यु. पाटील सर,के आर चौधरी सर,एस.पी तावडे सर, आर पी पाटील सर, एस. व्ही शिंदे सर यांनी केले याप्रसंगी गुरु वंदना म्हणून त्यांचा सन्मान करून येतोचित सत्कार समारंभ करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक तत्कालिन वर्गमित्र प्रा. यशवंत पवार यांनी केले त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या वैयक्तिक जीवनात तत्कालीन परिस्थितीत शिक्षकांनी छडी लागे छम..छम..विद्या येईल घम..घम या उक्तीप्रमाणे त्यांना घडवल्याचे ऋण व्यक्त केले, याबरोबरच व्यक्त होताना आपल्या कुटुंबाच्या सुखदुःखाच्या कटू गोड आठवणी सांगून पाणवलेल्या आस्वाद्वारे भावनांना वाट मोकळी करून दिली यानंतर काही दुःखद घटनांमुळे काही वर्गमित्र हरपल्यांची माहिती झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर संपूर्ण कार्यक्रमात सर्व शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन करून भविष्यातही तुमचा असाच हा स्कूलचा ग्रुप ॲक्टिव्ह ठेवून एकमेकांना सहकार्य करावे असे मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी तत्कालीन गायन कोकिळा म्हणून संबोधणारी कल्पना मोरे हिने सुंदर आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवडावा व ए मेरे वतन के लोगो हे गीत गाऊन वातावरण मंत्रमुक्त केले  यावेळी हे सर्व वर्गमित्र वर्गमित्रिणी आपापल्या प्रशासकीय सेवेत,राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, उद्योग कृषी,ज्ञान,शेती व्यापार,सैन्यदल अशा विविध क्षेत्रात एक प्रकारे नाविन्यपूर्ण ओळख निर्माण करून यशस्वी हीं झालेले आहेत याप्रसंगी गेट-टुगेदर ला आद्य सुरुवात करणारे कवी स्वप्नील बाविस्कर यांनी शेतकरी मायबाप काव्ययसंग्रहाचे गुरुवर्य यांच्या हस्ते प्रकाशन हीं केले याप्रसंगी केले यावेळी नेदरलँड मध्ये असणारे वर्गमित्र अमोल मधुकर चिंचोले याबरोबरच शरद तावडे,यशवंत पवार,दिलीप तावडे,योगेश्वर तावडे,सलीम तडवी,अमोल चव्हाण, राजेंद्र पाटील,एकनाथ पाटील,बाळू पाटील,कलीम पटेल, जितेंद्र सोनवणे,ज्ञानेश्वर पाटील,मतीन शेख,हारुण पटेल,प्रशांत नाकवे,गणेश पाटील, दत्तू पाटील,गोपाल पाटील, गजानन फौजी,दिलीप तावडे,चंद्रकांत कोळी,रामकृष्ण पाटील,रवी भोई,प्रकाश पाटील,किरण पाटील, एकनाथ पाटील, चंद्रकांत कोळी,लक्ष्मी पाटील,मैना पाटील, कल्पना पाटील, सुनंदा पाटील,वर्षा पवार,उर्मिला पाटील,दिपाली नांद्रे,ज्योती पाटील,प्रतिभा पाटील,सुरेखा पाटील,आशा पाटील, वर्गमित्र व वर्गमैत्रिणी उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय गीत वंदे मातरम म्हणून करण्यात आली

No comments