Breaking News

नांद्रा क्रिएटिव्ह स्कूल ला फूड फेस्टिवल(बाल आनंद) उत्साहात साजरा


नांद्रा क्रिएटिव्ह स्कूल ला फूड फेस्टिवल उत्साहात साजरा 

नांद्रा ता.पाचोरा प्रतिनिधी

( प्रा. यशवंत पवार)














येथील क्रिएटिव्ह इंग्लिश स्कूल ला सालाबादप्रमाणे विद्यार्थ्यांना स्वावलंबन व आत्मनिर्भर होण्यासाठी पुस्तकी शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण करून अभ्यासाला पूरक उद्योग व्यवसायातही खरी कमाई करून भविष्यात उद्योग व्यवसायाला कशा रीतीने चालना देता येईल यासाठी बालवयातच फूड फेस्टिवल बाल आनंद मेळावा आयोजित करून विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे चमचमीत चटपटीत असे खाद्यपदार्थांची मेजवानीच या मेळाव्यात भरवली गेली होती या कार्यक्रमाचं उद्घाटन नांद्रा प्रभारी पोलीस पाटील भूषण पाटील आसनखेडे,नांद्रा उपसरपंच शिवाजी तावडे,नांद्रा ग्रामपंचायत सदस्य योगेश सूर्यवंशी, ग्राम. पंचायत सदस्य किशोर खैरनार,ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र पाटील, बामरुड मा. सरपंच शशिकांत वाघ, सह परिसरातील पालक माता महिला भगिनी यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले या कार्यक्रमानिमित्त परिसरातील अनेक पालक वर्ग यांनी आपल्या विद्यार्थ्यांना पाच रुपये दहा रुपयाचे मेनू खरेदी करून मेजवानी पण दिली व सुमारे 35 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्टॉल उभारून खाद्यपदार्थ विक्रीतून खरी कमाई केली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून किरण आनंदा पाटील, ईश्वर पाटील,संजय कोळी, रोशन शेख, मनोज पाटील,आप्पासाहेब जावळे,विनोद तडवी, कैलास पाटील, ज्ञानेश्वर पाटील, गजानन ठाकूर, शिवाजी सूर्यवंशी, सूर्यभान पाटील,अमोल पाटील, सागर पाटील,ओम पवार,सुरेश सोनवणे,नवल पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. यशवंत पवार यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीते साठी नम्रता पाटील,कीर्ती सिनकर, हर्षदा सोनार ,शालिनी भोई, आरती सोनवणे, शीतल पाटील ,पूजा सूर्यवंशी,चंद्रकला तावडे, गुरुदास साबळे यांनी परिश्रम घेतले

No comments