Breaking News

नांद्रा हायस्कूलमध्ये चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण समारंभ संपन्न


नांद्रा हायस्कूलमध्ये चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण समारंभ संपन्न

नांद्रा ता.पाचोरा (वार्ताहर )

(प्रा.यशवंत पवार )






येथील आप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालय नांद्रा येथे गेल्यावर्षी ग्रामविकास फाउंडेशन संचलित माजी सभापती नितीन तावडे यांच्या संकल्पनेतून कै. कैलास रामकृष्ण तावडे यांच्या स्मरणार्थ कुरंगी गटातील चित्रकला स्पर्धेचे प्राथमिक व माध्यमिक शालेय स्तरावर आयोजन करण्यात आले होते यामध्ये कुरंगी,नांद्रा,माहेजी, बांबरुड येथील प्राथमिक व माध्यमिक स्तरातील पहिली ते दहावीच्या जवळजवळ सुमारे बाराशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या सहभागी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन आज दिनांक 13 जानेवारी वार मंगळवार रोजी श्रीराम आश्रम मठाधिपती परमपूज्य 1008 डॉ. विष्णुदास जी स्वामी यांच्या शुभ हस्ते गौरवण्यात आले याप्रसंगी राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार प्रा. यशवंत पवार यांचाही ग्राम विकास फाउंडेशन व माध्यमिक विद्यालय यांच्याकडून अनुक्रमे स्वामीजी व मुख्याध्यापक एस के पाटील यांच्या हस्ते गौरव शाल श्रीफळ देऊन करण्यात आला याप्रसंगी गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, महिला पालक भगिनी,शिक्षण प्रेमी सह सरपंच सुभाष अण्णा तावडे, उपसरपंच शिवाजी आप्पा तावडे,ग्रामपंचायत सदस्य किशोर खैरनार, शालेय सल्लागार समिती अध्यक्ष डॉ. वाय जी पाटील, सदस्य विनोद आप्पा बाविस्कर,संजू बाजीराव पाटील,नांद्रा प्राथमिक शाळेचे गोसावी सर, कुरंगीचे नारायण पाटील, कुरंगी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सूर्यवंशी सर, अमोल तावडे सर विशाल तावडे  एस पाटील सर सर पस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी. एस. पाटील माध्यमिक विद्यालयचे मुख्याध्यापक एस के पाटील सर यांनी केले तर सूत्रसंचालन गजानन ठाकूरसर यांनी केले तर विशेष परिश्रम म्हणून कलाशिक्षक जोशी सर यांनी नियोजन सांभाळले याप्रसंगी एकूण 36 विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून डॉ.स्वामी विष्णूदासजी महाराज यांनी आपल्या जीवनात सांस्कृतिक, कला व चित्रकला याला अलौकिक महत्त्व असल्याचे सांगून त्याच अनुषंगाने विविध रंगांचे पैलू आपल्या अध्यात्मातल्या उदाहरणांची जोड घालून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी आभार प्रदर्शन एल एम पाटील पर्यवेक्षक यांनी केले कार्यक्रमाचे साठी सर्व शिक्षक शिक्षिका वृंद व ग्रामविकास फाउंडेशन यांनी प्रयत्न केले

No comments