माहेजी जि.प.उर्दू शाळा शिक्षक नूर खान इलियास खान यांचा मुबंई येथे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान
नांद्रा ता. पाचोरा ( प्रतिनिधी)
( प्रा. यशवंत पवार)
माहेजी येथील जि. प. उर्दू शाळेचे तंत्रस्नेही व विद्यार्थीप्रिय उपक्रमशील शिक्षक नूर खान इलियास खान यांचा
मुंबई येथे रविवार, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी आरंभ हॉल येथे बी दि चेंज फाउंडेशन आयोजित *राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६* सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. या सोहळ्यात देशातील विविध राज्यांतील गुणी, कर्तव्यनिष्ठ व समाजाभिमुख शिक्षकांचा त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.
शिक्षक हे समाजाची भावी पिढी घडविणारे खरे शिल्पकार असून, त्यांच्या निःस्वार्थ सेवाभावाचा गौरव व्हावा या उद्देशाने बी दि चेंज फाउंडेशनतर्फे दरवर्षी या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. यावर्षी हा मानाचा सोहळा मुंबई येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय माजी सैनिक अधिकारी श्री. अरुण भंडारे, अभिनेत्री सौ. निवेदिता पगार, तसेच श्री. अमृत रोहोम आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय संस्थेचे अध्यक्ष श्री. मयूर ढोकचौळे व विश्वस्त श्री. अभिषेक तुपे* यांनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली.
यावेळी *_नूर खान इलियास खान __जि प उर्दू शाळा माहिजी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव* यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले योगदान तसेच अनेक आदर्श विद्यार्थी घडविल्याबद्दल राष्ट्रीय आदर्श शिक्षक २०२६ या पुरस्काराने गौरविण्यात आले.
या सन्मानामुळे त्यांच्या कार्याची समाजातील विविध स्तरांतून प्रशंसा होत असून, भविष्यातील शैक्षणिक कार्यासाठी हा पुरस्कार अधिक प्रेरणादायी ठरेल, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
माहेजी जि.प.उर्दू शाळा शिक्षक नूर खान इलियास खान यांचा मुबंई येथे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान
Reviewed by Creative News
on
January 19, 2026
Rating: 5
No comments