क्रिएटिव्ह स्कूल ला संविधान जागर देशभक्तीपर विविध कार्यक्रम उत्साहात
नांद्रा ता. पाचोरा (प्रतिनिधी )
(प्रा यशवंत पवार)
येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी स्व. माजी सैनिक ह. भप. लोटन दावजी पाटील यांचे सुपुत्र माजी सैनिक व सद्या मुंबई पोलीस येथे कार्यरत समाधान लोटन पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला तर ग्रामपंचायत कार्यालयावर सरपंच कल्पनाताई सुभाष तावडे यांच्या हस्ते तलाठी कार्यालयावर हिरालाल सूर्यवंशी यांच्या हस्ते मराठी शाळा येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बापू सातपुते यांच्या हस्ते व माध्यमिक विद्यालय येथे शेख सर व मुख्याध्यापक एस के पाटील सर यांच्या हस्ते तर नांद्रे ते शहीद जवान कैलास वसंत सूर्यवंशी यांच्या घरावर ज्येष्ठ नागरिक आप्पा सिताराम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले याप्रसंगी विद्यार्थ्यांनी "साक्षर जनता भूषण भारता" या अंतर्गत शपथ घेऊन गावापासून एकही व्यक्ती निरक्षर राहणार नसल्याची शपथ घेतली याबरोबरच कवायत संचालन सवाद्य करून देशभक्तीपर वातावरण निर्माण केले याबरोबरच संविधानाचा जागर अंतर्गत विद्यार्थ्यांनी नाटिका,एकपात्री अभिनय, देशभक्तीपर नृत्य, भाषणे सादरीकरण करून आलेले पालक वर्ग व ग्रामस्थ व शिक्षण प्रेमी यांची मने जिंकली याप्रसंगी सरपंच कल्पनाताई सुभाष तावडे, सुभाष अण्णा तावडे,उपसरपंच शिवाजी तावडे,ग्रामसेविका अनीताताई सपकाळे,ग्रामपंचायत सदस्यां ललिता दिलीप सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य योगेश सूर्यवंशी, किशोर खैरनार,भाऊसाहेब बाविस्कर, पत्रकार राजू पाटील,पोलीस पाटील भूषण पाटील,हिरालाल सूर्यवंशी,बापूसर सूर्यवंशी, विनोद अप्पा बाविस्कर,शिवाजीबापू सूर्यवंशी, सूर्यभानदादा भदाणे,नरेश राठोड, चंद्रकांत सूर्यवंशी, डॉ. दीपक पाटील राहुल सूर्यवंशी,गुलाब पाटील,पंकज सूर्यवंशी संजीव पाहुणे ,योगेश्वर तावडे,दिलीप तावडे, निकम सर, माध्यमिक स्कूल स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष डॉ. वाय जी पाटील पाटील याप्रसंगी आप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालय सांस्कृतिक कार्यक्रम झाले याप्रसंगी क्रिएटिव्ह स्कूल ला महिला पालक ग्रामस्थ व तरुण वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाला सूत्रसंचालन शिक्षिका आरती सोनवणे तर प्रास्ताविक प्रा. यशवंत पवार यांनी केले यावेळी देशभक्तीपर वातावरणामध्ये संपूर्ण कार्यक्रम उत्साहात साजरा झाला कार्यक्रम यशस्वीतेसाठी नम्रता पाटील, कीर्ती सिनकर, हर्षदा सोनार,आरती सोनवणे,शालिनी भोई,शीतल पाटील,पूजा सूर्यवंशी,चंद्रकला तावडे,गुरुदास साबळे,नवल पाटील यांनी परिश्रम घेतले
नांद्रा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
Reviewed by Creative News
on
January 26, 2026
Rating: 5
No comments