Breaking News

क्रिएटिव्ह स्कूलमध्ये विविध हिवाळी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न


 क्रिएटिव्ह स्कूलमध्ये विविध हिवाळी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

 नांद्रा ता.पाचोरा प्रतिनिधी

 प्रा. यशवंत पवार 












येथे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व त्यांना आंतर शालेय वातावणात बाह्य क्रीडांगणावरील विविध स्पर्धेची माहिती व्हावी व त्यांच्यामध्ये कला व क्रीडा व सांघिक एकात्मतेची भावना वाढीस लागावी व विविध खेळांविषयी त्यांच्या आवड निर्माण होऊन त्यांचा शारीरिक मानसिक व शैक्षणिक व बौद्धिक असा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून क्रिएटिव्ह स्कूल येथे नुकत्याच बाह्य हिवाळी क्रीडा सप्ताह आयोजित करण्यात आला यामध्ये विविध बाह्य सांघिक क्रीडा सामने खेळवण्यात आले त्यामध्ये थ्री लेग कॉम्पिटिशन,रनिंग कॉम्पिटिशन, जम्पिंग कॉम्पिटिशन, चेअर कॉम्पिटिशन,लेमन स्पून कॉम्पिटिशन, म्युझिक चेअर कॉम्पिटिशन, मॅजिक चेअर कॉम्पिटिशन घेण्यात आले यामध्ये सर्वप्रथम पाच विजेत्या विद्यार्थ्यांना वर्गानुसार स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरवण्यात येणार आहे कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी प्रा.यशवंत पवार,नम्रता पाटील,गीता पटाईत,कीर्ती सिनकर,आरती सोनवणे,शितल पाटील, हर्षदा सोनार, शालिनी भोई, पूजा सूर्यवंशी, चंद्रकला तावडे,गुरुदास साबळे यांनी परिश्रम घेतले

No comments