क्रिएटिव्ह स्कूलचे ओलंपियाड परीक्षेत 21 विद्यार्थी गोल्ड, सिल्वर व ब्राँझ मेडल मिळवून पुढील लेव्हल साठी पात्र*
क्रिएटिव्ह स्कूलचे ओलंपियाड परीक्षेत 21 विद्यार्थी गोल्ड, सिल्वर व ब्राँझ मेडल मिळवून पुढील लेव्हल साठी पात्र*
नांद्रा ता. पाचोरा(प्रतिनिधी) -
(प्रा यशवंत पवार)
क्रिएटिव्ह इंग्लिश स्कूल येथे ओलंपियाड एक्झाम 2026 मध्ये मॅथ विषयात इयत्ता पहिली ते चौथीचे एकूण 31 विद्यार्थी प्रवेशित होते त्यापैकी 21 विद्यार्थी यांनी गोल्ड,सिल्वर व ब्रास मेडल प्राप्त करून घवघवीत यश संपादन करून पुढील लेव्हल साठी पात्र ठरले आहेत या सर्व विद्यार्थ्यांचे स्कूलच्या वतीने कौतुक व अभिनंदन करण्यात येत असून यामध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये प्रेम राहुल कोळी, दिशांत ज्ञानेश्वर सूर्यवंशी,मानवी प्रकाश पटाईत,कार्तिक रवींद्र मराठे,उत्कर्ष नामदेव पाटील,सुदिक्षा किरण ढाके,हितेश लक्ष्मण भुरे,योगेश शरद बच्छाव,सेवक गणेश पाटील,हृदय नामदेव पाटील,नेहल संजय भोई,तोहीद हारून मेवाती,देवांश पवन सूर्यवंशी ,आर्या विलास पाटील या विद्यार्थ्यांचा समावेश असून यांनी विशेष प्राविण्य सह गोल्ड सिल्वर व ब्राझ मेडल पटकावून पुढच्या लेव्हल साठी पात्र ठरले आहेत त्यांच्या यशस्वीतेसाठी मार्गदर्शक म्हणून प्रा. यशवंत शिक्षिकावृंद नम्रता पाटील,अरुंधती राजेंद्र,आरती सोनवणे,शालिनी भोई, हर्षदा सोनार,कीर्ती सिनकर,शितल पाटील,गीता पटाईत, पूजा सूर्यवंशी, चंद्रकला तावडे यांनी शैक्षणिक भूमिका बजावली असून विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक व अभिनंदन केले

No comments