Breaking News

क्रिएटिव्ह स्कूल येथे संत गाडगे महाराज जयंती निमित्त स्वच्छता अभियान

क्रिएटिव्ह स्कूल येथे संत गाडगे महाराज जयंती निमित्त स्वच्छता अभियान

नांद्रा ता. पाचोरा* (प्रतिनिधी )

प्रा यशवंत पवार









माणसात देव शोधणारा संत म्हणजे समाज सुधारक डेबुजी झिंगोजी जानोरकर म्हणजेच संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त क्रिएटिव्ह स्कूल ला त्यांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण करून त्यांना अभिवादन केले. भुकेलेला अन्न,तहानलेला पाणी, मूक प्राण्यांना अभय,गरिबांना शिक्षण देण्यासाठी समाजात ठिगळ कपडे घालून, हातात झाडू खराटा घेऊन अगोदर गाव स्वच्छ करून मग मिळलेल्या भाकर तुकडा खात व रात्री भजने म्हणून सामाजिक जनजागृती केल्याची माहिती प्रा यशवंत पवार यांनी विद्यार्थ्यांना दिली यावेळी विद्यार्थी यांनी संपूर्ण स्कूल परिसर स्वच्छ करून गाडगेबाबांनी सांगितलेला संदेश आपल्या जीवनात अंगीकारण्याची शपथ घेऊन स्वच्छता अभियान राबवून स्कूलच्या परिसरातील संपूर्ण झाडांची पाने कचरा व वर्गामधली केरकचरा साफ करून गाडगेबाबांना विनम्र अभिवादन करून जयंती साजरी केली कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. यशवंत पवार, शिक्षिका वृंद नम्रता पाटील,कीर्ती सिनकर, शीतल पाटील, हर्षदा सोनार,आरती सोनवणे, गीता पटाईत,शालिनी भोई, पूजा सूर्यवंशी, चंद्रकला तावडे गुरुदास साबळे यांनी परिश्रम घेतले

No comments