नांद्रा येथील कन्या सौ.क्रांतीताई यांची माहिजी माताची सुंदर कविता वाचाच
कविता
* माहिजी माय
गिरणाथडीत्ले काय वं? शे मनी माहिजी माय वं
शाकम्भरी चावदस पुनीले रोडगा नवस
मायनी पालखी गावभर फिरस
मायन्या अंगणी, मायन्या रिंगणी
फुगडी खेवू बट्ट्या मैतरणी
मायना कपायी कुकूं शोभे रविकिरण
नाकी नथ मोतीनी तीनी भेटणी चांदणं
पायी चांदीना कल्ला, तोडा कि- भार
बोटेसमा बेला घडणारा पाचोरा ना सोनार
माहिजी माय ना हिरवा शालू
नऊवारी मायन्या हातभर बांगड्या खणखण करी
मायना दरबारी मंगलाष्टक गजर
माय लगीन ले राहस हजर
मायनी खण नारयनी ओटी
भरतीस सवासणी श्रध्दा -भाव पोटी
साखरफुटाणा खोबरं, रेवड्या प्रसाद
नान्हा-मोटासले पालखी पायना ना - नाद
मायना जत्रा मा तांबा-पितय आंदण
शेव - जलेबी, कांदा-भाजी दुकान
बठा संसार जत्रा मा भेटस सोयस्कर
जत्रा नी यादगिरी लेतस दिलदार ।।
बारा - पंधरा खेडासले जुपेत् बैलगाडी
आज ना घड़ी रिक्षा-मोटारगाडी
गयात त्या चंदेरी - सोनेरी दिवस
माय तुले भेटानी मनमा से आस
जत्रा मा फिराना आनंद लाकमोल जुन्या आठवणी ऊबदार शाल
माय शे मनी माय दर्पण
मायना चरणी कविता करस अर्पण ||
मी क्रांती पाटील,
नांद्रा माहेर, भामरे सासर
माहेजी माय नी ख्याती खान्देशभर ||
क्रांती पाटील , जळगाव,
ब जे पटेल नगर

No comments