लासगाव जि.प.शाळाचे शिक्षक मयूर वैष्णव यांना विभागीय विज्ञान ओलंपियाड स्पर्धेत यश, राज्यस्तरावर पात्र*
नांद्रा ता. पाचोरा (प्रतिनिधी*)
*प्रा यशवंत पवार*
नांद्रा येथील रहिवासी व निवृत्त केंद्रप्रमुख सुरेशदास गोपालदासजी वैष्णव यांचे सुपुत्र जि प प्राथमिक शाळा लासगाव येथे कार्यरत असलेले मयूर सुरेशदास वैष्णव हे गेल्या मागच्या वर्षी पवित्र पोर्टल परीक्षा मार्फत निवड होऊन त्यांची नियुक्ती जि. प.शाळा लासगाव येथे झाली आहे त्यांनी यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद पुणे (SCERT) या संस्थेतर्फे शैक्षणिक वर्ष 2025/26 मध्ये शासकीय व अनुदानित शाळांमधील शिक्षकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते त्यातील विज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धेत मयूर वैष्णव यांनी अगोदर तालुका व जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून त्यानंतर नाशिक विभाग स्तरावरील दि. 27 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या स्पर्धेत नाशिक विभागातून प्रथम क्रमांक प्राप्त करून ते आत्ता राज्यस्तरीय विज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत त्यामुळे त्यांचं नांद्रा सह परिसरातील सर्व शिक्षण प्रेमी, शिक्षकवृंद व शैक्षणिक संस्थेकडून अभिनंदन करण्यात येत आहे
लासगाव जि.प.शाळाचे शिक्षक मयूर वैष्णव यांना विभागीय विज्ञान ओलंपियाड स्पर्धेत यश, राज्यस्तरावर पात्र*
Reviewed by Creative News
on
January 01, 2026
Rating: 5
No comments