Breaking News

नांद्रा येथे 35 वर्षांपूर्वीचे क्रिकेटर वर्गमित्र जमले,पुन्हा जुन्या आठवणी खेळाडूवृत्तीने जोपासायला

नांद्रा येथे 35 वर्षांपूर्वीचे क्रिकेटर वर्गमित्र जमले,पुन्हा जुन्या आठवणी खेळाडूवृत्तीने जोपासायला

नांद्रा ता.पाचोरा प्रतिनिधी 

(प्रा. यशवंत पवार)

 येथील पूर्वीचे स्कूलचे नाव न्यू इंग्लिश स्कूल येथे शिकत असलेले सन 1990 ते २००० सालच्या 10वीत दरम्यान जे विद्यार्थी म्हणून या शाळेत शिकत होते त्यांची नांद्रासह, कुरंगी,मायजीटेशन, बहुळा कॉलनी खेडगाव,आसनखेडा,पाहण, स्कूल बोर्डिंग अशा ठिकाणी वर्गमित्र तत्कालीन वेळेस क्रिकेट खेळत होते व त्यामुळे परिसरातही क्रिकेटची क्रेझ असल्याने गावागावात टूर्नामेंट भरवल्या जायच्या त्याच अनुषंगाने प्रत्येक गावाचं अस्तित्व खेळामार्फत किमान पहिले नाही तरी तिसरे बक्षीस आणण्यासाठी प्रत्येक गावाचे हे खेळाडू क्रिकेटर झटत असत त्यामुळे प्रत्येक गावात प्रत्येक टूर्नामेंट ही त्या गावाची अस्तित्वाची लढाई असायची आणि अशातच तत्कालीन परिस्थितीतील त्यावेळेस असणारे वर्गमित्र कोणी बॉलिंग मध्ये श्रेष्ठ, कोणी बॅटिंगमध्ये श्रेष्ठ,कोणी विकेटकीपर तर कोणी कॉमेंटेटर तर कोणी हम्पायर तर कोणी डाय मारण्यामध्ये श्रेष्ठ,कोणी क्षेत्ररक्षण श्रेष्ठ असे प्रत्येक खुबी असणारे हेच क्रिकेटर आज मात्र वयाच्या 40 शी ओलांडल्यानंतरही तोच जोश घेऊन आप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालयाच्या पटांगणावर खेळताना जोश मध्ये दिसले  आज यामध्ये अनेक विद्यार्थी हे आज  आर्मी मधून निवृत्त होऊन नोकरीला पोलीस दलात,शासकीय नोकरीला,शिक्षक म्हणून नोकरीला,वैद्यकीय,डॉक्टर,इंजिनीयर, बँक, व इतर नामांकित क्षेत्रात व शेती व्यवसायात तज्ञ अशा विविध क्षेत्रात निपुण आहेत तरी त्यानी आपले तत्कालीन वर्गमित्र व गावाशी जोडलेली नाळ कधी तोडली नाही म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रभरात गेल्यावर आजही त्यांना तत्कालीन परिस्थितीतील आपले क्रिकेटर मित्र एकत्र यावेत म्हणून त्यांनी वर्षाच्या प्रत्येक डिसेंबर च्या एक रविवारी आपल्या व्हाट्सअप ग्रुप मार्फत डॉक्टर अभय भावे यांच्या संकल्पनेतून तत्कालीन कर्णधार ठाणे सेक्युरिटी गार्ड अधिकारी सुपडू सूर्यवंशी व महेश गवादे सर यांच्या नियोजनातून व्हाट्सअप ग्रुप करून प्रथम सर्व तत्कालीन क्रिकेटर यांना संघटित केले व त्यानुसार पहिल्या वर्षाच्या शुभारंभ प्रसंगी नाममात्र शुल्क जमा करून त्यामध्ये क्रिकेट बॅट बॉल स्टंप घेऊन संपूर्ण रविवार आपल्या जुन्या स्कूल मध्ये मॅच लावून पूर्ण एन्जॉय केल्यानंतर एकमेकांच्या पुन्हा सुखदुःखात हजर राहण्याचे आना भाका घेऊन खेळाडू वृत्तीने एकमेकांचा उत्साह वाढवला व स्नेहभोजनाचाहीं आस्वाद घेतला यामुळे परिसरातील इतर वेगवेगळ्या खेळाचे खेळाडू यांनाही प्रेरणा मिळाली असून तेही पुढे याच प्रकारे एकत्रित येऊन क्रिकेट,व्हालीबॉल, कब्बडी, कुस्ती,बलखांब खेळ खेळण्याचे नियोजन करणार आहैत्त या क्रिकेट खेळासाठी खालील खेळाडू यांनी आपली उपस्थित दिली होती योगेश बागुल. विकास खैरनार.महेश गवादे.सुपडू पाटील.अभय भावे. भैय्या फौजी.गफा फौजी. पंकज फौजी. प्रवीण फौजी.दिलीप मास्तर.बंडू पाटील बाळू पाटील.मुन्ना गोरख पाटील.दिनेश मिस्त्री योगेश सपकाळे,.प्रदीप देवरे,सागर तावडे,अनिल तावडे. पंकज बाविस्कर.,छोटू कुंभार,राहुल नगराज,शिवाजी तावडे,. विनोद बाविस्कर,सजय पावणे ताडे,पिंटू खैरनार.,भोला बाविस्कर,यशवंत पवार,.नवागाव भाचा.असे तत्कालीन खेळाडू उपस्थित होते




No comments