Breaking News

बैलगाडीच्या शर्यतीत नांद्रा येथील बैल जोडी अव्वल आल्याने काढली गावातून डीजे वर मिरवणूक

 

*बैलगाडीच्या शर्यतीत नांद्रा येथील बैल जोडी अव्वल आल्याने काढली गावातून डीजे वर मिरवणूक


*           प्रा. यशवंत पवार   नांद्रा ता.पाचोरा- बैल पोळा या दिवशी बैलाचा उत्सव संपूर्ण भारतात साजरा करण्यात येतो या दिवशी बैलाला सजवून सजवून गोड गोड नैवेद्य पुरणाची पोळी खाऊ घालून ओवाळून त्या दिवशी त्याची  सजवून व पूजन करून त्याची पूर्ण गावात मिरवणूक काढतो व बळीराजा सुखावतो व  तो नंदी देवताही अनुषंगाने आपल्या मालकाचे कृतज्ञता म्हणून शेतात राब राब राबून भरघोस उत्पन्न मशागत करून शेतकरी राजाला पिकवून देतो अशा बैल राजाचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे बैलजोडीच्या शर्यती राहतात त्याच प्रकारे आपल्या खानदेश मध्ये ही कजगावला  रविवारी झालेल्या अशा बैलजोडींच्या शर्यती  मध्ये नांद्रा येथील तरुण शेतकरी स्वप्निल तावडे व गजू सूर्यवंशी यांनी आपल्या एकेक बैलांच्या बैलजोडीने छकडे  गाड्यावर स्पर्धेत भाग घेऊन पाच हजार एक रुपयाचं रोख बक्षीस मिळवून अव्वल क्रमांक मिळवला आहे त्यामुळे नांद्रा परिसरातील तरुण शेतकरी यांच्यात प्रचंड उत्साह निर्माण झाला असून त्यांनी गावातच डीजेवर मिरवणूक काढून या बैल जोडीला गावातून मिरवणूक काढून त्यांचे पूजन करून गावात जल्लोष केला त्यामुळे गावात शेतकरी वर्गात व पशुपालकात आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे

No comments