Breaking News

गो.वि.महाजन विद्यालयात बहिःशाल व्याख्यानमाला: विद्यार्थ्यी करिअर गाईडन्स कार्यक्रम

  मलकापूर प्रतिनिधी 


       स्थानिक मलकापूर शिक्षण समिती द्वारा संचलीत गोविंद विष्णू महाजन येथे गणेश बिहि:शाल व्याख्यानमालेत तिसरे पुष्प अर्पण करतांना विद्यार्थ्यांसाठी करिअर गाईडन्स कार्यक्रम संपन्न झाला. सकाळच्या सत्रात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मलकापूर शिक्षण समितीचे सहसचिव, प्राचार्य एम पी कुयटे तर प्रमुख मार्गदर्शक श्री साई अकॅडमीचे संचालक प्रमोद कौसकर आदी मान्यवर उपस्थित होते. 


   मागील ४६ वर्षांची परंपरा असलेल्या या गणेश बहियःशाल व्याख्यामालेत विद्यार्थ्यांनच्या विविध गुणांचा विकास होण्याच्या  उद्देशाने विविध स्पर्धा, परिक्षा व उपक्रम तसेच अनेक तज्ञ, अनुभवी व अभ्यासू व्यक्तींचे मार्गदर्शन आयोजित करण्यात येत असते. 

    यात विद्यार्थ्यांना भविष्याच्या दिशा निश्चित करण्याच्या उद्देशाने  मार्गदर्शन करतांना साई अकॅडमी, मोताळाचे संचालक प्रमोद कौसकर यांनी स्पर्धा परिक्षा अभ्यासक्रम, अभ्यास पद्धती, व अभ्यासाचे तंत्र याविषयी माहिती सांगीतली. सोबतच भविष्याच्या दिशा निश्चित करतांना विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवे बरोबरच पोलिस, सैन्य भरती आदींमधील नोकरीच्या संधी याबाबतही मार्गदर्शन केले.  

    कार्यक्रमाचे संचलन प्रा डाॅ नितीन भुजबळ, प्रास्ताविक प्रा.विजय पुंडे, तर आभार प्रदर्शन  सौ. दिपा सोळंके  यांनी केले. दर कार्यक्रमाच्या आयोजनात ह.का.गीरी.,रमेश ईंगळे यांचे योगदान राहिले.

No comments