Breaking News

पत्रकार दिनानिमित्त पाचोरा येथे उत्तम कांबळे सर यांची पत्रकारिता कार्यशाळा चे आयोजन


 *पत्रकार दिनानिमित्त पाचोरा येथे उत्तम कांबळे सर यांची पत्रकारिता कार्यशाळा चे आयोजन*                                (पाचोरा प्रतिनिधी) - (प्रा. यशवंत पवार )      निर्मल फाउंडेशन पाचोरा जिल्हा जळगाव द्वारा आयोजित मराठी पत्रकारितेचे जनक व आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांसाठी "पत्रकारिता कार्यशाळाचे आयोजन" दिनांक 9 जानेवारी वार सोमवार रोजी सकाळी 11 ते 5 दरम्यान निर्मळ इंटरनॅशनल स्कूल  पाचोरा येथे आयोजित करण्यात आलेली आहे या पत्रकारिता कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय श्री उत्तम कांबळे सर 



लेखक,कवी,पत्रकार,संपादक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्व अध्यक्ष आणि सकाळ समूहाचे माजी मुख्य संपादक हे मार्गदर्शन करणार आहेत.याबरोबरच कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून डॉ. विक्रम बांदल,उपविभागीय अधिकारी पाचोरा, श्री हेमंत आलोने संपादक दैनिक देशदूत, श्री दीपक पटवे  संपादक दैनिक दिव्य मराठी, श्री धो.ज. गुरव सल्लागार संपादक दैनिक लोकशाही, श्री विकास भदाणे संपादक दैनिक पुण्यनगरी,श्री मनोज बारी आवृत्ती संपादक दैनिक देशोन्नती, श्री सचिन जोशी ब्युरोची दैनिक सकाळ हे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहे तरी या कार्यशाळेसाठी पत्रकारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक सौ वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी अध्यक्ष निर्मल फाउंडेशन व संचालिका निर्मल सीड्स यांनी केलेले आहे कार्यक्रमाला अल्पोहार व भोजनाची ही व्यवस्था केलेली असून त्यानंतर पत्रकारांना कीट ही वाटप होणार आहे तरी पंधरा मिनिट अगोदर येऊन प्रत्येकाने नोंदणी गरजेचे आहे असे आयोजकांनी कळविले आहे✍️

No comments