Breaking News

...आणि तरुणांनी दिले शिवजयंतीला गांधी टोपीला प्राधान्य


 *...आणि नांद्रा तरुणांनी दिले शिवजयंती ला गांधी टोपीला प्राधान्य-                   नांद्रा ता. पाचोरा (प्रा. यशवंत पवार ✍️) -  शिवजयंती म्हटली म्हणजे तरुणाईच्या अंगामध्ये दोन दिवसा अगोदरच रक्तामध्ये एक वेगळीच ऊर्जा संचारून त्यासाठी विविध प्रकारचे नियोजन सुरू होते व त्यामध्ये मग वैचारिक विषयाला चालना देण्यासाठी इतिहासकालीन विषयांवर सामाजिक विषयावर व्याख्यान, कीर्तन  असे समाज प्रबोधन पर  कार्यक्रम असतील, तरुणाईला जल्लोष साजरा करण्यासाठी ढोल ताशांचा व डीजेच्या गजरात धरलेला लेझीमचा ठेका असेल

किंवा मग वेशभूषा च्या दृष्टिकोनातून, फेटे कुर्ता पैजामा, झेंडे, टी-शर्ट यांचे नियोजन असेल,परंतु नांद्रा येथील शिवप्रेमी, शिव स्मारक ग्रुप व राजे छत्रपती संभाजी महाराज ग्रुप या तरुणाईच्या डोक्यात यावेळेस मात्र वेशभूषेतील कुर्ता पायजमा च्या वर असलेला फेटा याला प्राध्यांना न देता त्यांनी चक्क सर्व तरुणांनी सामूहिक गांधी टोपी घालून तीही गावातील ज्येष्ठ

गांधी टोपी चालणाऱ्या ग्रामस्थांकडून  परिधान करून सन्मानपूर्वक शिवजयंती ला शिवपूजन करून शिवजयंती  साजरी  करण्याची भन्नाट कल्पना अवतरली,त्याला कारणही तसेच आज शिवजयंतीला विविध संस्थेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करत असताना या वर्षी ग्रामपंचायत मध्येही शिवजयंती साजरी करण्यासाठी जेष्ठ गावातील नागरिक श्री संजय जगन बाविस्कर यांना सन्मान देण्यात आला त्या ठिकाणी जवळजवळ शंभर ते दीडशे तरुणाई व ग्रामस्थ कार्यक्रमाला उपस्थित होते परंतु त्या ठिकाणी एकाच्या ही डोक्यात गांधी टोपी न होती,  कारण कोणत्याही शुभ कार्य पूजनासाठी टोपीची गरज असतेच, याच गोष्टीकडे तरुणाईने सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून आपल्या सन्मानाचे प्रतीक असलेली गांधी टोपीचे महत्त्व ओळखून ती फक्त वृद्ध लोकांच्याच डोक्यात दिसत असल्याने तिची जाणवत असलेली कमतरता मात्र  सायंकाळी या तरुणांनी भरून काढली शिवस्मारक जवळ साजरी होणारी शिवजयंती उत्सवासाठी शिवजयंतीत आलेल्या घरातील प्रत्येक तरुणाला गांधी टोपी परिधान करून पुढेही प्रत्येक सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, कार्यक्रमात ती घालण्याचा  मनाशी एक चंग बांधून आपले नांद्रा गावाचे तरुण मनावर घेतलं तर कोणतीही गोष्ट सामूहिक रित्या करू शकतात असे वेगळेपण यामध्ये सिद्ध करून फेट्यांवर होणारा अवाजवी खर्च बाजूला सारून एक चांगला पायंडा यावेळेस सामूहिक रित्या घेतलेल्या निर्णयामुळे त्यांचे जेष्ठ नागरिक, वृद्ध गांधी टोपी धारक व ग्रामस्थ यांच्याकडून कौतुक होत आहे व त्यांच्या निर्णयाचे स्वागत होत आहे

No comments