Breaking News

बांबरुड राणीचे येथे संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन आयोजित संत निरंकारी मिशन शाखा बांबरुड द्वारे 111 रक्तदात्यांनी केले रक्तदान

बांबरुड राणीचे  येथे संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन  आयोजित  संत निरंकारी मिशन शाखा बांबरुड द्वारे 111 रक्तदात्यांनी केले रक्तदान

नांद्रा ता.पाचोरा(प्रतिनिधी )-रोजी पाचोरा तालुक्यातील बांबरुड(राणीचे) येथील ब्रॅचच्या वतीने संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशन व्दारा आयोजित संत निरंकारी मिशन च्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी 111 व्यक्तींनी रक्तदान केले

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा संयोजक रमेश कुमार आहूजाजी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ज्ञानप्रचारक राजकुमार वाणीजी उपस्थित होते.रक्त केंद्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथील डॉ.कुणाल देवरे, डॉ.लक्ष्मीकांत त्रिपाठी, डॉ.वैष्णवी गावंडे, डॉ.संकेत सस्ते यांनी रक्त संकलन केले.या शिबीरात एक शे अकरा  रक्तदात्यांनी रक्तदान केले.


संपूर्ण विश्वात जागतिक स्तरावर जनकल्याणासाठी रक्तदान शिबीरांचे आयोजन सुदिक्षा माताजी सविंदर हरदेव महाराज,संत निरंकारी मंडळ दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत.

रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी  सत्यविजय काळे,(मुखी - ब्रांच बांबरूड राणीचे) निलेश पवार (सेवादल इन्चार्ज), गोपाल डहाके, विजय पाटील, प्रकाश डहाके, प्रमोद गवडी, राहुल पदमे, , नाना डहाके, जयदेव जगताप,विजय काळे,केशवजी पाटील (वाडी शेवाळे), पत्रकार राजेंद्र पाटील पत्रकार प्रा. यशवंत पवार यांची उपस्थिती होती याप्रसंगी सर्व संत निरंकारी सत्संग शाखा भक्तगण रक्तदात्यांचे सहकार्य लाभले याप्रसंगी संत निरंकारी भक्तगणांना प्रथमच शाखा मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता व स्वयं शक्तीने व स्वयंशिस्तीने सर्व स्वयंसेवक आपलं या रक्तदानाच्या ठिकाणी आपापले कर्तव्य पार पडत होते 

 

No comments