Breaking News

स्कूल तक... स्कूल के बाद भी.., क्रिएटिव्ह स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतली वृक्ष लागवड, संरक्षण, संवर्धनाची शपथ


 स्कूल तक... स्कूल के बाद भी.., क्रिएटिव्ह स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतली वृक्ष लागवड, संरक्षण, संवर्धनाची शपथ                                    पाचोरा (प्रतिनिधी)-  येथील स्कूलच्या कॅम्पस मध्ये अगोदरच निसर्गरम्य वातावरण आहे त्यामध्ये विविध प्रकारचे वृक्ष हे जोमाने डोलत आहेत यामध्ये अजून भर म्हणून 51 विविध प्रजातीचे रोपे ग्रामपंचायत कार्यालय नांद्रा यांच्यामार्फत वृक्ष लागवड साठी स्कूलला देण्यात आली होती त्याच अनुषंगाने स्कूलच्या परिसरात

विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने प्रत्येक झाडे स्वतः जवळ घेऊन त्याला खड्ड्यात मातीने पुरून त्यावर माती पाणी टाकून जोपर्यंत ते स्कूलला विद्यार्थी आहेत व त्यानंतर ही ते इथून स्कूल सोडून गेल्यानंतरही ते आपले कर्तव्य म्हणून स्कूल टाक और स्कूल के बाद भी या उ क्तीप्रमाणे झाडाची निगा राखतील व त्याचे संरक्षण संवर्धन व संगोपन करतील अशी सामूहिक शपथ

त्यांनी आज घेऊन उत्साहामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला ज्याप्रमाणे आपले आई-वडील म्हातारे झाले की आपण त्यांची सेवा करणे आपलं आद्य कर्तव्य असतं त्याच प्रकारे त्याच म्हातारे आई-वडिलांनी लहानपणी आपल्यावर चांगले संस्कार शिक्षण व संगोपन केलेले असल्याने आपण कृतज्ञता व परोपकारातून मातृ-पितृसेवा जसा धर्म पाळतो तसंच वृक्ष झाडे,झुडपे आपल्याला विविध प्रकारच्या प्राणवायू देतातच परंतु निसर्गाचा समतोल राखून प्रत्येक सजीवाला निवाराही देतात  म्हणून आपली ही जबाबदारी आहे त्यांची निगा राखून त्यांचे संरक्षण व संवर्धन वृक्षरोपण करून  जोपासावे असं प्रा. यशवंत पवार यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातून संबोधित करताना सांगितले यावेळी संपूर्ण टीचर्स स्टॉप उपस्थित होता

No comments