क्रिएटिव्ह स्कूल ला शिक्षक दिन उत्साहात साजरा✍️
*क्रिएटिव्ह स्कूल ला शिक्षक दिन उत्साहात साजरा....*✍️ शिक्षकांना विद्यार्थ्यांनी दिले विविध भेटवस्तू 🎁पाचोरा (प्रतिनिधी )नांद्रा येथील क्रिएटिव्ह स्कूल ला यावर्षी विद्यार्थ्यांनी शिक्षकांपासून तर प्राचार्य पर्यंत विविध वेशभूषेत शिक्षकाची भूमिका साकारून अध्ययन अध्यापनाचे कार्य केले सुरुवातीला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनावरील व शिक्षक म्हणून आपल्या जीवनात गुरूंचे स्थान याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी विविध प्रकारच्या भेटवस्तू आणून शिक्षकांसमोर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला याप्रसंगी विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये एक आदर्श नागरिक होण्याची प्रतिज्ञा घेतली
No comments