Breaking News

पावसाच्या तात्पुरत्या आगमनाने शेतकरी वर्गाला काहीसा दिलासा ✍️

*पावसाच्या तात्पुरत्या आगमनाने नांद्रा परिसरात काही प्रमाणात दिलासा* पाचोरा (प्रतिनिधी )नांद्रासह परिसरामध्ये बऱ्याच दिवसापासून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतीचे मटेरियल,रासायनिक खते,कोळपणी,वखरणी होऊन शेतकरी वर्ग पावसाच्या प्रतीक्षेत होता श्रावण महिन्यात पाहिजे तसा पाऊस न आल्याने शेतकऱ्यांना आता उत्तराचा पावसाची येण्याची जोरदार अपेक्षा होती परंतु गेल्या बऱ्याच दिवसापासून  पावसाने हुलकावणी दिली होती परंतु काल पावसाने दिनांक 4 सप्टेंबर रोजी नांद्रा सह परिसरात काही प्रमाणात हजेरी लावल्याने त्यामुळे कपाशी सह इतर पिकांना दिलेले रासायनिक खत यामुळे पिकांना पोषक पाऊस पडल्याने शेतकरी काही प्रमाणात समाधानी आहे अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा नांद्रा सह परिसरात आहे

No comments