Breaking News

नांद्रा परिसरात दमदार पावसाची प्रतीक्षा

कृषिवार्ता 


  नांद्रा परिसरात दमदार पावसाची प्रतीक्षा        *प्रा. यशवंत पवार*       पाचोरा(प्रतिनिधी )-नांद्रासह परिसरामध्ये बऱ्याच दिवसापासून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतीचे मटेरियल,रासायनिक खते,कोळपणी,वखरणी होऊन शेतकरी वर्ग पावसाच्या प्रतीक्षेत होता श्रावण महिन्यात पाहिजे तसा पाऊस न आल्याने शेतकऱ्यांना आता उत्तराचा पावसाची येण्याची जोरदार अपेक्षा होती परंतु गेल्या बऱ्याच दिवसापासून  पावसाने हुलकावणी दिली होती परंतु काल पावसाने दिनांक 4 सप्टेंबर रोजी नांद्रा सह परिसरात काही प्रमाणात हजेरी लावल्याने त्यामुळे कपाशी सह इतर पिकांना दिलेले रासायनिक खत यामुळे पिकांना पोषक पाऊस पडल्याने शेतकरी काही प्रमाणात समाधानी झालेत परंतु श्रावण महिन्यातही पाहिसा जोरदार पाऊस न झाल्याने अजूनही विहिरींच्या पातळीत पाहिजे तशी वाढ झालेली नाही याबरोबरच अतिशय उष्णता यामुळे कपाशीवरही थ्रिप्स व इतर रोगराई जाणवत आहे त्यामुळे जोरदार पावसामुळे या मव्ह व तुडतुड्या सारख्या कीटकाचं नायनाट होईल याबरोबरच विहिरींच्याही पाण्यात पातळीत वाढ होईल, काही बागायती शेतकरी विहिरीच्या पाण्यावर शेतात टाक पाडून टाक फट्टी पाडून पाणी देण्याचे नियोजन करत आहेत कारण कपाशीच्या फुल फुगड्या जास्त उष्णतेमुळे खाली पडत आहेत व त्यांच्यावर ताण पडत आहे परंतु कोरडवाहू शेतकरी यांना मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा असून तेव्हाच कपाशीचा माल पक्का होऊन घरापर्यंत पोहोचेल असे जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले त्यामुळे अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा नांद्रा सह परिसरात आहे

No comments