 |
| प्रामाणिकपणा ✍️ |
*कला शिक्षक यांचा असाही प्रामाणिकपणा* पाचोरा (प्रतिनिधी ) -प्रा. यशवंत पवार नांद्रा येथील कलाशिक्षक अनिल दादा तावडे यांना नांद्रा येथीलच समर्थ वेल्डिंग वर्क से संचालक कैलास भाऊ पवार यांचा 20हजार रुपये किंमतीचा मोबाईल सकाळी दहा वाजता मराठी शाळेजवळ नांद्रा येथे सापडला त्यानंतर त्यांनी त्याचं शोध घेतला असता त्यांना तो गावातीलच कैलास भाऊ यांचा असल्याचा कळाल्यावर त्यांनी त्यांच्या वेल्डिंग वर्कशॉप ला जाऊन तो प्रामाणिकपणे परत केला या अगोदरही स्वतः अनिल दादा तावडे यांचाही असाच मोबाईल गाव दरवाजा नांद्रा येथे पडला होता तो गावातीलच मधु भाऊ कुंभार यांना सापडला होता तोही त्यांना त्यांनी घरपोच प्रामाणिकपणे परत केला असल्याने नांद्रा येथील प्रत्येक तरुणाच्या अंगात हा प्रामाणिकपणा भिनला असून या ठिकाणी प्रतिशनिशिंगणापूर सारखे दरवाजे जरी उघडे असले तरी चोरी होत नाही,चुकूनही कोणाची वस्तू कुठे हरवली व कोणाला सापडली तर तिचा शोध घेऊन ती प्रामाणिक त्यांना घरपोच केली जाते, याच प्रकारचे नांद्रा येथील द्विपिंड महादेव महाराजांचा आशीर्वाद सर्वांना असल्याने तेच सर्वाना सुबुद्धी देत असतात अशी भाविकांची श्रद्धा आह✍️
No comments