Breaking News

नांद्रा येथे वीज कडाडल्याने घरगुती उपकरणांचं मोठं प्रमाणात नुकसान

 

*नांद्रा येथे मध्यरात्री कडाडलेल्या वीज मुळे घरगुती उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान                                           प्रा यशवंत पवार ( पाचोरा प्रतिनिधी )* येथे दिनांक 6 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री विजा सकट पावसाला दहा वाजता  जोरदार सुरुवात झाल्यावर काही क्षणातच एक जोरदार विजेच्या कडकण्याच्या आवाज होऊन ती जवळच शेतात पडली परंतु त्यामुळे गावातील बहुतांश लोकांचे टीव्ही, पंखे,एलईडी लाईट, आरो पाणी मशीन जळाले यामध्ये नारायण त्रंबक तावडे यांचा एलईडी टीव्ही व पंखा जळाला,परमेश्वर नामदेव पाटील यांचं वरचे तींघे फॅन, पाण्याच्याचे आरो मशीन व  टीव्ही जळाला,दुर्गाबाई पवार यांचे दोन पंखे जळाले, नंदू सोनवणे यांच्या घरातील सर्व सीएफएल लाईट व फॅन जळाले, विनोद आप्पा बाविस्कर यांचा टीव्ही दोन फॅन व लाईट हे जळाले तसेच गावातही भोईवाडा, कोंबडापुरी, शिवाजीनगर व इतर परिसरातही घरगुती उपकरणे जळाल्याच्या घटना समोर आल्या आहेत तरी या अनपेक्षित घडलेल्या घटनेमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपत्ती व्यवस्थापनाकडून या झालेल्या घरगुती उपकरणांचे नुकसानांचे पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळण्याची मागणी या नुकसानग्रस्त ग्रामस्थांकडून कडून करण्यात येत आहे

No comments