Breaking News

नांद्रा जि प शाळेमध्ये प्रेरणा सभा उत्साहात संपन्न


 *नांद्रा जि.प. शाळेत प्रेरणा सभा संपन्न           पाचोरा(प्रतिनिधी )                             प्रा. यशवंत पवार*

 जि. प. शाळा,नांद्रा येथे काल दि-१५-१०-२०२२ शनिवारी बाला उपक्रमांतर्गत प्रेरणा सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. वाय. जी.पाटील होते.या प्रसंगी भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष व जेष्ठ नागरिक श्री जीवन मन्साराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रेरणा सभेचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. मोहिनी पाटील मॅडम यांनी केले.  सामनेर केंद्राचे केंद्र प्रमुख मा. श्री.धीरज पाटील सरांनी बाला उपक्रमातील निकष याबाबत ppt दाखऊन  मार्गदर्शन केले .तेव्हा गावातील श्री. किशोर पाटील यांनी 11000रु,श्री. योगेश सूर्यवंशी यांनी 5000रु व श्री.नारायण शिंपी यांनी 501 रु देणगी जाहीर केली. त्याबद्दल व्यवस्थापन समितितर्फे त्यांचे आभार मानन्यात आले. सभेस कुरंगी केन्द्राचे केंद्रप्रमुख मा.श्री.अनिल जाधव सर व केंद्रातील ज्येष्ठ शिक्षक, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच अध्यक्ष व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती, गावातील शिक्षणप्रेमी, पालक बंधू भगिनी उपस्थित होते.सभेचे सूत्रसंचालन श्रीम.प्रतिभा पाटील मॅडम यांनी केले.

शाळा व्यवस्थापन  समितीच्या सहकार्याने ,आजची प्रेरणा सभा उत्साहात पार पडली. नियोजन ते प्रत्यक्ष कार्यक्रम यात सर्व सदस्यांनी आपली उपस्थिती व सहभाग  दिला ,याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏


No comments