Breaking News

महिला दिनानिमित्त विधवा भगिनींचा क्रिएटिव्ह स्कूल तर्फे होणार सन्मान


 *महिला दिनानिमित्त विधवा भगिनींचा क्रिएटिव्ह स्कूल तर्फे होणार सन्मान*           (चला सन्मान करू या समाजात विधवा भगिनींचाही.., पेलत आहे तेही कुटुंबाची  सक्षमपणे खरी जवाबदारी )              *नांद्रा ता.पाचोरा  (प्रा. यशवंत पवार* ✍️) सालाबादाप्रमाणे क्रिएटिव्ह स्कूल ला महिला दिनानिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवून याबरोबरच विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण व महिला भगिनींसाठी विविध खेळ घेऊन त्यामध्ये त्यांना व्यक्त होण्यासाठी खुले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत असते, चला खेळ खेळू या... व भरघोस बक्षीस जिंकूया..या पद्धतीने महिला भगिनींसाठी एक विरंगुळा व त्यांचा सन्मान केला जात असतो याच अनुषंगाने यावर्षीही महिला दिनाच्या निमित्ताने सर्व सन्माननीय महिला पालक प्रतिनिधी यांचे या ठिकाणी हळदीकुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त स्वागत सत्कार करून त्यांना आकर्षक भेटवस्तू ही देण्यात येणारच आहे  परंतु याबरोबरच अनेक महिला भगिनी असे आहेत की आज त्यांचे पाल्य याच शाळेत शिकत आहेत व त्यांना पितृछत्र नाही परंतु अतिशय सक्षमपणे या अशा विधवा महिला भगिनी आपली जबाबदारी यशस्वीपणे पेलत आहेत व चांगले शिक्षण मिळावं म्हणून या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये त्यांनी आपले मुलं दाखल केलेले आहेत अशा महिला विधवा भगिनींचाही सन्मान सगळ्यात अगोदर होणे गरजेचे असल्या कामे संचालक प्रा. यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनातून सर्व शिक्षिका वृंद स्टाफ यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे यामध्ये कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड जळगाव शहराध्यक्ष सौ करुणा साळुंखे गरुड ह्या उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच आशाताई भिकन तावडे व सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला परिसरातील दहा खेड्यातून महिला भगिनी यांची उपस्थिती लाभणार आहे याबरोबरच विरंगुळाचे खेळ म्हणून सामूहिक खेळ संगीत खुर्ची लिंबू चमचा एक मिनिट महिला दिनाचे इंग्रजी मराठी हिंदी मध्ये भाषणे असे विविध  कार्यक्रम भरघोस बक्षीसही देण्यात येणार असल्या त्याने जास्तीत जास्त महिला भगिनींनी उपस्थिती देण्याची आवाहन आयोजकांकडून करण्यात आलेले आहे

No comments