Breaking News

नांद्रा येथे कपाशीची पुन्हा एकदा धाडसी चोरी, नागोबा मंदिराचा ही ऐवज लंपास


 *नांद्रा येथे कपाशीची पुन्हा एकदा धाडसी चोरी, नागोबा मंदिराचा ही ऐवज लंपास        नांद्रा ता.पाचोरा (प्रतिनिधी)                      (प्रा. यशवंत पवार)*                 येथील नांद्रा पहाण रस्त्याला नागोबा मंदिर जवळ असलेले शरद बळीराम तावडे यांच्या फार्म हाऊसच्या गोडाऊनवर सुमारे 100 ते 110 क्विंटल असलेल्या कापूस मधून सुमारे अंदाजे 40 क्विंटल कापूस, सौर ऊर्जावर चालणारे इन्व्हर्टर व इतर शेती अवजार याबरोबरच नागोबाच्या मंदिराचा घंटा,नागोबा,  जला धारि कलश,अशा जबरी धाडसी चोरी केल्यामुळे नांद्रा परिसरात शेतकरी वर्गांमधून पशुपालकांमधनं भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या अगोदरही तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष त्र्यंबक बाविस्कर यांच्या ही वीस ते पंचवीस क्विंटल चोरी झालेल्या कपाशीचा सुद्धा तपास न लागल्यामुळे

पुन्हा एकदा परिसरातील शेतकरीवर्ग भयभीत झाले असून पोलीस यंत्रणेतर्फे आता जिकरीचा प्रयत्न करून चोरांचा तपास लावण्याचे मोठे आव्हान उभे राहिले  आहे घटनास्थळी पोलीस यंत्रणा दाखल झाले असून यामध्ये पीएसआय गगने, पीएसआय वरटे,पोलीस हेड

कॉन्स्टेबल वाघमोडे,पोलीस कॉन्स्टेबल परदेसी कॉन्स्टेबल निलेश गायकवाड हे प्राथमिक तपास करत आहेत

No comments