Breaking News

कुऱ्हाड येथे 3 सप्टेंबर रोजी भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन


कुऱ्हाड येथे 3 सप्टेंबर रोजी भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन
                              पाचोरा (प्रतिनिधी-प्रा. यशवंत पवार)

अण्णासाहेब देशमुख फाउंडेशन व मेडिलिव्ह मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल नासिक संचालक भूमिपुत्र डॉ. शरद देशमुख पोट विकार व लिव्हर तज्ञ व डॉ.सुचिता देशमुख स्त्री रोग व प्रसूती शास्त्र तज्ञ यांच्या संयुक्त विद्यमाने कुऱ्हाड येथे विनामूल्य महाआरोग्य शिबिर आयोजन दिनांक 3 सप्टेंबर वार रविवार रोजी सकाळी 10 ते 4. वा.दरम्यान करण्यात आलेले आहे तरी नाव नोंदणी करून जास्तीत जास्त रुग्णांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे, शिबिराला अनेक एम डी., एम. एस,तज्ञ डॉक्टर्स उपस्थिती देणार आहेत, त्यामध्ये मेंदू,नेत्ररोग, मोतीबिंदू, हृदयरोग, संधिवात, त्वचारोग, दंतरोग, अस्थिरोग,पोट विकार, लिव्हर विकार, आहार तज्ञ, बाल रोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, फी जेसियन,किडनी विकार तज्ञ असे डॉक्टर्स उपलब्ध होणार आहेत याबरोबरच मोफत तपासण्यामध्ये ईसीजी, बीएमडी,लिव्हरफायबरस्कॅन, बी एम आय, ब्लड प्रेशर, डायबेटिक न्यूरोपॅथी स्किनिंग, शुगर, लिव्हर फंक्शन टेस्ट,यूरिक ॲसिड, हेपिटायटिस बी.व सी तपसनी, हिमोग्लोबिन या प्रकारच्या तपासण्याही मोफत होणार आहेत तरी जास्तीत जास्त गरजूंनी रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक डॉ शरद अण्णा देशमुख  हॉस्पिटल नाशिक चे संचालक यांनी केले आहे विशेष सहकार्यामध्ये कुऱ्हाड डॉक्टर टीम,संपूर्ण ग्रामस्थ कुऱ्हाड,ग्रामपंचायत कमिटी,सोसायटी  कमिटी,कृष्णा लॅब व आदर्श हायस्कूल यांचे सहकार्य लाभले आहे शिबिराचे ठिकाण आदर्श माध्यमिक विद्यालय कुऱ्हा ड येथे आहे.

No comments