Breaking News

नांद्रा येथे रोटरी क्लब जळगाव व कृषी सम्राट फाउंडेशन आयोजित महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

 

नांद्रा येथे रोटरी क्लब जळगाव व कृषी सम्राट फाउंडेशन आयोजित महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न      नांद्रा ता. पाचोरा-                (प्रतिनिधी-प्रा यशवंत पवार )         येथे दिनांक 27 ऑगस्ट रविवार रोजी रोटरी क्लब जळगाव व कृषी सम्राट फाउंडेशन  यांच्या संयुक्त विद्यमाने दंत तपासणी,नेत्र तपासणी व जनरल आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले याप्रसंगी 40च्या वर

रक्तदात्यांनी रक्तदान केले,शंभराच्या वर रुग्णांनी नेत्र तपासणी व दंत तपासणी करून चष्मे व मोतीबिंदू साठी नाव नोंदविले याबरोबरच जनरल आरोग्य चेकअप मध्ये रुग्णांना कॅल्शियम विटामिन व इतर मेडिसिनही देण्यात आली याप्रसंगी तपासणी करून रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नानासाहेब सूर्यवंशी व बाळासाहेब सूर्यवंशी संचालक लक्ष्मी ऍग्रो केमिकल नांद्रा हे होते याप्रसंगी प्रमुख आरोग्य तपासण्यासाठी आलेले डॉक्टर टीम मध्ये रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. आर्यन कुलकर्णी, डॉ.

विवेक वडजीकर, डॉ. इसरार, डॉ. माधवी वडजीकर, डॉ.अपर्णा मकासरे,डॉ. रेखा महाजन, डॉ, रवी महाजन, डॉ.बागवान,डॉ. अनिल चौधरी,डॉ. भाग्यश्री सूर्यवंशी,सौ उज्वला वर्मा, रोटरी क्लब सदस्य सुनंदा देशमुख, विलास नायर, नितीन ननवरे,किशोर सूर्यवंशी, यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाला लक्ष्मी अग्रो

संचालक बाळासाहेब सूर्यवंशी, नानासाहेब सूर्यवंशी,सरपंच अमोल सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य कल्पना सुभाष तावडे, दिलीप हिरामण पाटील,

माधवराव हिरामण पा,संजय हिरामण पाटील,साहेबराव आबा तावडे,संजय जगन बाविस्कर, संजय रघुनाथ पाहुणे, सुभाष तावडे,प्रा.यशवंत पवार यांची उपस्थिती लाभली कार्यक्रम यशस्वी साठी संपूर्ण रोटरी क्लब जळगाव रेड क्रॉस सोसायटी, लक्ष्मी केमिकल, गावातील तरुण ग्रामस्थ यांचे सहकार्य करावे

No comments