Breaking News

नांद्रा येथे थोर स्वातंत्र्यसैनिक यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून क्रांती दिन साजरा

 


नांद्रा येथे थोर स्वातंत्र्यसैनिक यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण  करून क्रांती दिन साजरा                       नांद्रा ता. पाचोरा                         ( प्रा.यशवंत पवार)                      येथे  दि.9 ऑगस्ट क्रांतीदिन निमित्त "ग्रामपंचायत मध्ये पारतंत्र्यात इंग्रजांशी लढा देऊन प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती देणारे नांद्रातील थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय माधवराव लाला सूर्यवंशी, स्वर्गीय लोटन सोनजी सूर्यवंशी,स्वर्गीय कपूरचंदजी नथमल मुथा या थोर स्वातंत्र्यसेनानी यांच्या प्रतिमेचे पूजन माल्या र्पण स्वातंत्र्य सैनिक पाल्य,ग्रामस्थ व ग्रामपंचायत कमिटी चे सरपंच, उपसरपंच, ग्रा. प. सदस्य यांच्या उपस्थितीत क्रांती दिन निमित्त हुतात्म्यांना व स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहून त्यांची स्मृतीला उजाळा देऊन साजरा करण्यात आला  याप्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून स्वातंत्र्य सैनिक पाल्य तथा माजी ग्रामपंचायत सदस्य

विश्वनाथ लोटन सूर्यवंशी हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य योगेश सूर्यवंशी यांनी केले याप्रसंगी क्रांती दिन व गावातील स्वातंत्र्य सेनानी यांचे योगदान याविषयी प्रा. यशवंत पवार,पंकज बाविस्कर, विश्वनाथ लोटन सूर्यवंशी यांनी त्यांचे कार्य आपल्या विचारातून मांडले  याप्रसंगी स्वातंत्र्यसैनिक पाल्य व कुटुंबातील सदस्य वसंत माधवराव पाटील,रमेश माधवराव पाटील,लखुजी कपूरचंद मुथा,हिरालाल भारत पाटील,मोहन मुरलीधर पाटील,मेघराज ईश्वर सूर्यवंशी,साहेबराव वामन तावडे,बंटी साहेबराव सूर्यवंशी, गणेश दशरथ सूर्यवंशी , जीवन बापूजी,सरपंच अमोल सूर्यवंशी,उपसरपंच शिवाजी गावडे ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब बाविस्कर, योगेश सूर्यवंशी, बंडू भावराव सूर्यवंशी, राहुल भदाणे, दिलीप तावडे, आप्पा मंगलदास सूर्यवंशी व गावातील ग्रामस्थ तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली

No comments