Breaking News

लोखंडी कढई व तव्यावरील आहार होईल उत्तम आरोग्य साकार- डॉ.निळकंठ पाटील ,नांद्रा येथे वृंदावन फाउंडेशन, महा लॅब व ग्रामपंचायत नांद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचे मोफत रक्त तपासणी शिबिर उत्साहात संपन्न


 लोखंडी कढई व तव्यावरील आहार होईल उत्तम आरोग्य साकार- डॉ.निळकंठ पाटील नांद्रा येथे वृंदावन फाउंडेशन, महा लॅब व ग्रामपंचायत नांद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचे मोफत रक्त तपासणी शिबिर उत्साहात संपन्न      नांद्रा ता.पाचोरा                    (प्रतिनिधी-प्रा. यशवंत पवार)                  येथे वृंदावन फाउंडेशन, महा लॅब व ग्रामपंचायत कमिटी नांद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विविध  प्रकारच्या आजारांचे मोफत रक्त तपासणी शिबिर डॉ. निळकंठ पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले याप्रसंगी शंभराच्या जवळपास महिला भगिनी यांचे रक्त तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे याप्रसंगी डॉक्टर निळकंठ पाटील यांचा नुकतेच त्यांनी शेतकरी हिताचे केळी कट्टी व सकाळचा निलाव बाजार समितीत विषय लावून धरल्यामुळे झालेला बदल याबद्दल सरपंच अमोल भाऊ सूर्यवंशी, साहेबराव वामन तावडे, योगेश सूर्यवंशी,प्रा.यशवंत पवार, रमेश माधवराव पाटील,गणेश सूर्यवंशी, यांच्यामार्फत जाहीर सत्कार करण्यात आला याबरोबरच मार्गदर्शनपर मनोगतात डॉ. निळकंठ पाटील यांनी महिलांचे विविध आजार व समस्या याविषयी विस्तृत मार्गदर्शन करून रक्त तपासणीच्या माध्यमातून पुढील रुग्णांवरील माफक दरात किंवा मोफत उपचार वृंदावन हॉस्पिटलमध्ये करण्यात येण्याचे सांगून आपल्या दैनंदिन आहारामध्ये लोखंडी कढई,तवा या भांड्यामध्ये अन्न शिजवून,भाजून खाण्याचे फायदे सांगून आपल्या दैनंदिन वापरात त्याचे वापर करण्याचे आवाहन महिला भगिनी यांना केले

याप्रसंगी सूत्रसंचालन प्रा. यशवंत पवार यांनी केले याप्रसंगी वृंदावन हॉस्पिटलचे पी आर ओ सिनकर साहेब,लोहार सर, महालॅब चे कोळी सर, सर पंच,अमोल सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य योगेश सूर्यवंशी, साहेबराव तावडे,गणेश सूर्यवंशी,

विशाल तावडे,आप्पा सूर्यवंशी,रमेश माधवराव पाटील,बंटी साहेबराव सूर्यवंशी, अंगणवाडी सेविकाताई,आशाताई सेविका,मदतनीस ताई व गावातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

No comments