Breaking News

कलाशिक्षक चिरंतर आपल्या कलाविष्कारामुळे नेहमी विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहतो - मान्यवरांचे गौरवोद्गार, पी एस पाटील माध्यमिक विद्यालय कलाशिक्षक आशिष बेले यांचा कर्तव्यपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न

 


कलाशिक्षक चिरंतर आपल्या कलाविष्कारामुळे नेहमी विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहतो - मान्यवरांचे गौरवोद्गार,पी एस पाटील  माध्यमिक विद्यालय कलाशिक्षक आशिष बेले यांचा कर्तव्यपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न

नांद्रा.पाचोरा                        (प्रतिनिधी -प्रा यशवंत पवार)     येथील आप्पासाहेब पी.एस.पाटील माध्यमिक विद्यालयातील कला शिक्षक आशिष नारायणराव बेले हे आपल्या प्रदीर्घ सेवेतून दि.३१ ऑगष्ट रोजी सेवानिवृत्त  झाले .


आज दि.१सप्टेंबर रोजी त्यांचा सेवावृत्ती सोहळा शालेय व्यवस्थापन समिती सदस्य भारत पाटील (वरसाडे) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला याप्रसंगी  आशिष बेलेसर यांनी कला शिक्षक म्हणून नांद्रा पाळधी लोहारा व नांद्रा असा आपला नोकरीचा प्रवास करत असताना त्यांनी प्रत्येक स्कूलला विविध प्रकारचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे कार्यक्रमात असो किंवा विद्यार्थ्यांना चित्रकले स्पर्धेच्या दरम्यान केलेले मार्गदर्शन असो शैक्षणिक साहित्याच्या निमित्ताने भिंतीवरचे फलक लेखन असो, तैलचित्र असो,पोस्टर चित्र, भिंतीवरचे चित्र असो  यामध्ये ते जीव ओतून त्याला सजीव रूप देत सर्व स्कूलच्या   भिंती बोलक्या केल्या , त्यामुळेच ते सेवानिवृत्त झाले तरी त्यांच्या हातून झालेला हा कलाविष्कार पिढ्यानपिढ्या स्कूल च्या भिंतीवर विद्यार्थी यांच्याशी निश्चित संवाद साधतील व बेले सर यांची चिरंतर  आठवण  काढतील असे गौरवोद्गार याप्रसंगी आलेल्या विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले

कार्यक्रमात श्री बेले सरांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांचे नातेवाईक श्री अतुलराव सुने ,सौ.मिनल सुने पुणे,ॲड श्री संदीप बेले,सौ.सारिका बेले अमरावती, श्री राहुल बेले,सौ.रुपा बेले पुणे, डॉ.संजय उमरकर जळगाव, संजय धर्मै जळगाव , गोविंद बारी मा.जि.प.सदस्य शेंदुर्णी यांच्या सह स्थानिक सल्लागार समिती चे विनोद आप्पा बाविस्कर, सुभाष बाविस्कर,आप्पा सिताराम बोरसे, किशोर खैरनार ग्रा.प.सद्स्य योगेश सूर्यवंशी, दिलीप सोनवणे, भाऊसाहेब बाविस्कर, यांच्या सह माजी मुख्याध्यापक एस.पी.तावडेसर,आर.यु.पाटील,पाळधीचे मुख्याध्यापक आर.एस.चौधरी, वडगाव चे मुख्यध्यापकमुख्यध्यापक पी.एल.पाटील,एस.व्ही.शिंदे शेदूर्णी, दिपक वारांगणे,नंदकुमार बागुल, क्रिएटिव्ह स्कूलचे प्रा.यशवंत पवार ,मनोज भाऊराव सुर्यवंशी, गणेश सुर्यवंशी,कवी स्वप्निल बाविस्कर,किरण सोनार, संजय बाजीराव पाटील, पत्रकार राजेंद्र पाटील यांच्या सह आप्तेष्ट मित्रपरिवार मोठा संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एस.के.पाटील, यांनी तर सूत्रसंचालन पी.ए.पाटील व गजानन ठाकूर यांनी केले.कलाशिक्षक आशिष बेले यांचा सह पत्नीक सत्कार शाळेच्या वतीने मुख्याध्यापक एस.के.पाटील सर व ताईंचा सत्कार व्हि.एस.पाटील मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला.विविध मान्यवरांनी सुद्धा बेले सरांचा सपत्नीक सत्कार केला.बेले सरांनी आपल्या सत्काराला उत्तर देतांना आपल्या मनोगतात सांगितले की या शाळेत मी गेल्या २२वर्षापासुन कला शिक्षक म्हणून कार्यरत होतो विद्यार्थ्यांना विविध चित्रकला स्पर्धा बरोबरच पाढे पाठांतरावर भर दिला मला शाळेने व गावाने भरभरून प्रेम दिले ते माझ्या स्मरणात नेहमीच राहील.शेवटी स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.एल.एम.पाटील यांनी आभार मानले.यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षेकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

No comments