नांद्रा येथे रविवारी भव्य दंत, डोळे व जनरल आरोग्य तपासणी शिबिर
नांद्रा येथे रविवारी भव्य दंत, डोळे व जनरल आरोग्य तपासणी शिबिर नांद्रा पाचोरा (प्रतिनिधी) (प्रा. यशवंत पवार ) येथे कृषी सम्राट फाउंडेशन,रेड क्रॉस सोसायटी जळगाव व रोटरी क्लब जळगाव यांच्या संयुक्त विद्यामाने भव्य नेत्र तपासणी शिबीर व जनरल आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर कार्यक्रम दिनांक 27 ऑगस्ट वार रविवार रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत आई तुळजाभवानी मंदिर लक्ष्मी केमिकल च्या बाजूला या ठिकाणी होणार संपन्न होणार आहे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री नानासाहेब सूर्यवंशी संचालक लक्ष्मी ऍग्रो केमिकल, श्री आर. एन.कुलकर्णी अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन व श्री एड. किशोर बी पाटील सेक्रेटरी रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन यांच्या शुभहस्ते होणार आहे या शिबिरामध्ये
नेत्र तपासणी फी वीस रुपये असून विविध प्रकारचे आजारांच्या तपासण्या होऊन तज्ञ डॉक्टरांकडून फक्त 200 रुपयात नजरेसाठी दुरचा व जवळचा चष्मा, याबरोबरच ना नफा ना तोटा या तत्त्वावर फक्त 2000/- रुपयात ऑपरेशन व इम्पॉर्टंट लेन्स मोतीबिंदू शस्त्रक्रिया व गरजू रुग्णांना मोतीबिंदू ऑपरेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तरी या शिबिरात नाव नोंदणीसाठी 94 23045101, 8007250656या नंबरवर नोंदणीचे आवाहन लक्ष्मी केमिकल संचालक नानासाहेब सूर्यवंशी यांनी केले आहे


No comments