Breaking News

नांद्रा परिसरात शेतीच्या मोटारीच्या केबल चोरी टोळी सक्रिय- भर रस्त्यावरील इलेक्ट्रीक पोलवरील तारांची चोरी


नांद्रा परिसरात  शेतीच्या मोटारीच्या केबल चोरी टोळी सक्रिय- भर रस्त्यावरील इलेक्ट्रीक पोलवरील तारांची चोरी 

नांद्रा ता.पाचोरा (प्रा. यशवंत पवार )        येथील जळगाव-पाचोरा रस्त्यावर असलेल्या चिंध्या नाला परीसरातील संजय पोपट पाटील यांच्या गट क्र.३५४/२या शेतात असलेल्या डिपीवरील विद्युत पुरवठ्याच्या मुख्य केबल तोडून विद्युत पुरवठा खंडित करुन १३ शेतकऱ्यांच्या शेतातील १३पोलवरील २००फुट प्रमाणे प्रत्येकी चार तार प्रमाणे ८हजार फुट तारा अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे.

यात संजय पाटील, रविंद्र तावडे नारायण तावडे, सुरेश पाटील, वसंत न्हावी, भगवान पाटील, यांच्या सह असंख्य शेतकऱ्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.


या बाबतीत विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पहाणी करून शेतकऱ्यांना आपल्या बिलासह अर्ज करण्यास सांगितले आहे या अगोदरही नांद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीसह परिसरातील शेतकऱ्यांच्या ही केबल काही दिवसापूर्वीच चोरांनी कापून नेल्या आहेत,

विज वितरण कंपनीच्या माध्यमातून अज्ञात चोरट्यांन विरोधात अद्याप कोणतीही तक्रार  दाखल झाली नाही.शेतकऱ्यांना त्यांचा विद्युत पुरवठा नियमित करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करुन नव्याने तार टाकून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची  व या केबल व तार चोर गॅंगचा  पोलीस विभागाकडून मुस्क्या आवळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

No comments