Breaking News

ग्रामपंचायत विहिरींवर किंवा पिण्याच्या टाकी जवळ जलजीवन मिशन अंतर्गत सौर ऊर्जा आर. ओ.पाणी शुद्धीकरण प्लांट बसवणे काळाची गरज

 

आर. ओ. प्लांट 

ग्रामपंचायत विहिरींवर किंवा पिण्याच्या टाकी जवळ जलजीवन मिशन अंतर्गत सौर ऊर्जा आर. ओ.पाणी शुद्धीकरण प्लांट बसवणे काळाची गरज                                                                                            नांद्रा ता. पाचोरा (प्रतिनिधी)  ( प्रा. यशवंत पवार)                             पाणी म्हणजे जीवन आज प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते याच अनुषंगाने केंद्र शासनाची  जल जीवन मिशन योजना यामुळे गावागावात, वाड्या वस्ती, पाड्यापर्यंत, घर घर,नवीन पाण्याच्या टाकी बरोबरच नवीन पाईपलाईन व घरघर कनेक्शन देण्याचे कार्य युद्ध पातळीवर  केंद्र व राज्य सरकार यांच्या समन्वयातून करण्यात येत आहे याच्यासाठी भरीव निधी देऊन  आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री माननीय गुलाबराव जी पाटील संपूर्ण राज्यभर कार्य करत आहेत. परंतु आज  काही गावे सोडली तर संपूर्ण गावांमध्ये पाण्याचं समस्या बऱ्या पैकी मिटल्या आहेत, प्रत्येक घरात मुबलक पाणी मिळत आहे, परंतु त्यापुढे जी समस्या आता निर्माण झाली आहे त्याच्या शुद्धतेची परंतु त्याबरोबरच पावसाळ्यामध्ये त्याच्या शुद्धतेची काय? हा मोठा प्रश्न निर्माण होतो कारण पावसाळा सुरू झाल्यावर नैसर्गिक वातावरण बदला मुळे


संसर्गजन्य व  साथीचे आजार दूषित पाण्यामुळे यावेळेस मोठ्या प्रमाणात उफाळतात यामध्ये सर्दी खोकला ताप,टायफाईड, मलेरिया, चिकन गुनिया, डेंगू  सदृश्य आजार फोफावतात, त्यामुळे लहान बालके असतील बाल -वृद्ध पुरुष-महिला असे घटक दूषित पाणी मुळे आजारी पडून दवाखाने या दिवसात तुडुंब भरलेले असतात त्यामुळेच प्रत्येक ग्रामपंचायतच्या पाण्याच्या टाकीजवळ किंवा पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींवर सौर ऊर्जावर चालणारी आरो पाणी शुद्धीकरण प्रणाली बसवणे आता काळाची  गरज होऊन बसलेली आहे कारण पारंपारिक पद्धतीने प्रत्येक ग्रामपंचायत च्या पाण्याच्या टाकीत टी सीएल हे टाकले जात असते परंतु त्यासाठी योग्य ते मापन नसते त्यामुळे त्याचा फारसा प्रभाव नसतो याबरोबरच शह री भागात घरात स्वतःचे महागडे आरो शुद्धीकरण यंत्र लोक लावून घेतात परंतु ग्रामीण भागात आजही

काही कुटुंब पारंपारिक माठाचे पाणीच उन्हाळा, हिवाळा, पावसाळा कायम  पिण्यासाठी माठच वापरतात व शेतात कायमस्वरूपी वास्तव्य असल्यामुळे विहिरींचेच नैसर्गिक प्राण्यांचे स्रोत असलेले पाणी पितात, आता यासाठी आता आमदार, खासदार,राजकीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनीही विशेष नाविन्यपूर्ण योजनांमध्ये ग्रामपंचायत पाण्याची टाकी वर किंवा विहिरींवर सौर ऊर्जांवर पाणी

शुद्धीकरण प्रणाली लावण्याविषयी आपल्या वरिष्ठांना आग्रही होणेआत्ता गरजेचे आहे जेणेकरून पावसाळ्यात उद्भवणारे पाण्याच्या दूषितपणामुळे होणारी रोगराई यावर काही प्रमाणात आळा घालता येईल व गोरगरीब जनतेला दवाखान्याचा खर्च वाचवता येईल व आपल्या देशाचे भविष्य असणारे नागरिक ही सुदृढ आरोग्यमय राहतील

No comments