जन जन की यही थी पुकार, चंदामामा पे हम हिंदुस्तानी ही होंगे स्वार.., चांदर्यानं 3 चा जल्लोष नांदर्यातही..!
जन जन की यही थी पुकार, चंदामामा पे हम हिंदुस्तानी ही होंगे स्वार.., चांदर्यानं 3 चा जल्लोष नांदर्यातही..! नांद्रा ता. पाचोरा (प्रतिनिधी-प्रा. यशवंत पवार)- संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेलं व भारताचं विशेष करून इस्रोच्या वैज्ञानिकांचं मेहनतीचं स्वप्न साकार होण्यासाठी प्रत्येक घटिकेवर सूक्ष्म लक्ष ठेवून अविरत चांदयान 3 यान 14 जुलैपासून लॉन्च झाल्यापासून तर आज त्याची दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग झाल्यावर संपूर्ण भारतात एकच जल्लोष निर्माण झाला, भारताने ही मोहीम फत्ते केल्याने जगात
सुवर्णाक्षराने भारताचे नाव कोरले गेले आहे व चंद्रावर दक्षिण ध्रुवावर तिरंगा फडकवणारा भारत हा पहिला देश झाला आहे, याच अनुषंगाने नांद्रा येथेही गावातील सर्व स्पर्धा परीक्षा देणारे नवतरुण,अग्निपंख क्लासेसचे संचालक घनश्याम खैरनार, गावातील सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक ,ग्रामस्थ, देशप्रेमी,यांनी महादेव मंदिराच्या चौकात येऊन या ठिकाणी या चांदयान 3 चे फत्ते झालेल्या मोहिमेच्या अनुषंगाने "भारत माता की जय", वंदे मातरम..,जय इस्रो,जन..जन.. की यही थी पुकार, चंदामामा पे हम हिंदुस्तानी होंगे स्वार..!अशा घोषणा देऊन आकर्षक दैदिप्यमान फटाक्यांची आतिषबाजी करून या ठिकाणी चांद्रयान 3 मोहीम फत्ते झाल्याबद्दल जल्लोष साजरा केला.

No comments