बांबरुड राणीचे येथे विंध्यवासीनी माता डोंगरावर निर्माण होणार ऑक्सिजन हब, माऊली ग्रुपने स्वीकारली वृक्ष लागवड, संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी - नाबार्ड व इतर सामाजिक संस्थांचा मिळाले पाठबळ
बांबरुड राणीचे येथे विंध्यवासीनी माता डोंगरावर निर्माण होणार ऑक्सिजन हब, माऊली ग्रुपने स्वीकारली वृक्ष लागवड, संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी - नाबार्ड व इतर सामाजिक संस्थांचा मिळाले पाठबळ
नांद्रा ता.पाचोरा (प्रतिनिधी -प्रा. यशवंत पवार ) बांबरुड राणीचे येथील विंध्यवासीनी माता मंदिर डोंगर परिसरात आजादी का अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय कृषि व ग्रामिण विकास बँक (नाबार्ड) ,माऊली वृक्ष प्रेमी गृप, स्पार्क एरिगेशन प्रा.लि.,श्री छत्रपती शिवाजी महाराज पर्यावरण व शेती विकास प्रतिष्ठान व सर्वोदय संस्था यांचे माध्यमातून वृक्ष लागवड कार्यक्रम अमृत महोत्सवानिमित्त 6फूट उंच असलेले 75 वृक्ष लागवड करून या ठिकाणी येणाऱ्या पाच वर्षात ऑक्सिजन हब तयार करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन नाबार्ड चे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत झांबरे यांनी दिले
याप्रसंगी त्यानी इतर सामाजिक समूह व संस्था यांच्याकडून ही पर्यावरण पूरक दृष्टिकोन निर्माण व्हावा हरित क्रांती घडावी व वृक्ष लागवड करूनच नव्हे तर त्यांचं संगोपन, संरक्षण करून त्यांचे संवर्धन व्हावे या व्यापक दृष्टिकोनातून त्यांनी बांबरुड येथील विंदासनी माता डोंगराळ खडकाळ भागात यावर्षी वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली त्यासाठी त्यांनी इतर संस्थांच्या सोबत घेऊन ठिबक सिंचनासाठी नळी झाडांना लागणारे खत व इतर सामुग्री ही उपलब्ध करून देण्याची
ग्वाही दिली या ठिकाणी त्यांनी माऊली ग्रुपचे ही खूप कौतुक केले की या तरुणांनी अवघ्या दोन दिवसात सांगितल्याबरोबर खड्डे तयार करून या अगोदरही अतिशय हिरवेगार नंदनवन त्यांनी या खडकाळ टेकड्यावर बनवण्याचे व या ठिकाणी त्यांची उत्कृष्ट निगा राखण्याचे व आपलेही पर्यावरण प्रति असलेले कर्तव्य उत्कृष्ट पार पाडत असल्याचे माऊली ग्रुपच्या कार्याविषयी आनंद व्यक्त केला,व यावर्षी आपण योग्य त्या ठिकाणी वृक्ष लागवड करत असल्याचे समाधान त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले याप्रसंगी सागरजी धनाड यांनी वृक्ष रोपे कशा पद्धतीने रोपण करावे याबाबत प्रात्यक्षिकातून माहिती सर्वांना दिली. तसेच जैवविविधता बहरण्यासाठी व्यापक काम होणे येणाऱ्या काळाची गरज असून त्या दिशेने लोकसहभागातून काम उभे करावे लागेल त्या दिशेने येथील कार्य पथदर्शी ठरेल असे प्रतिपादन केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पर्यावरण गतीविधीचे जिल्हा संयोजक मधुकर पाटील व जिल्हा मंडळ सदस्य उल्हास सुतार यांनीही पर्यावरण संवर्धन काळाची गरज याबाबत मार्गदर्शन केले. सर्वोदय बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भैयासाहेब पाटील यांनी टेकडी व पर्यावरण प्रेमी यांची माहिती दिली
![]() |
यावेळी ग्रामपंचायत सरपंच बुर्हाण तडवी, उपसरपंच शशिकांत वाघ,सदस्य गुलाब तडवी, विंध्यवासिनी माता ट्रस्टचे संचालक उपस्थित होते.तसेच सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील, धनंजय न्यूजचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील, क्रिएटिव्ह स्कुलचे प्रा.यशवंत पवार, प्रयोगशील शेतकरी बापूराव पाटील माऊली वृक्षप्रेमी ग्रुपचे किशोरभाऊ पाटील, दुर्वास कोळी,राजु गाव्हंडे,पिंटू दारकोंडे,सोनू सैंदाणे व सर्व पर्यावरण प्रेमी यांनी आपला सहभाग नोंदविला




No comments